Kamran Akmal vs PCB Chief Mohsin Naqvi Dainik Gomantak
क्रीडा

PAK vs BAN: "...मग आता ट्रॉफी चोरुन आणणार का?" PCB प्रमुखांच्या 'त्या' कृत्यावरुन अकमलनं उडवली खिल्ली; बांगलादेश मालिका गमावल्याचा काढला राग

Kamran Akmal Slams PCB Chief Mohsin Naqvi: अकमलने केवळ खेळाडूंनाच नाही, तर पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनाही लक्ष्य केले.

Manish Jadhav

Kamran Akmal Slams PCB Chief Mohsin Naqvi: टी-20 विश्वचषक 2026 च्या निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तानी क्रिकेट संघ नव्या उमेदीने उभारी घेईल, अशी अपेक्षा चाहत्यांना होती. मात्र, बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानच्या पदरी पुन्हा एकदा लाजीरवाणा पराभव पडला. यजमान बांगलादेशने तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा 11 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी आपल्या नावावर केली. या दारुण पराभवानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमलचा संयम सुटला असून त्याने पाकिस्तानी संघ आणि पीसीबी प्रमुखांवर शेलक्या शब्दांत टीका केली.

अकमलने पाकिस्तानी संघाच्या सद्यस्थितीवर संताप व्यक्त करताना म्हटले की, आज पाकिस्तानची अवस्था इतकी वाईट झाली आहे की, नेदरलँडसारखा संघही आपल्याला सहज हरवू शकतो. नेदरलँडलाही आता पाकिस्तानविरुद्ध खेळून विजय मिळवत कसोटी क्रिकेटमध्ये आपली जागा निश्चित करण्याची इच्छा होईल, इतकी घसरण आपल्या क्रिकेटची झाली आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या सामन्याचा संदर्भ देताना अकमल म्हणाला, "बांगलादेश (Bangladesh) सहजपणे 350 धावा करु शकला असता, मात्र ते 290 धावांवर बाद झाले. लिटन दास सवकाश खेळला, तरीही आपण हा सामना गमावला. हे अत्यंत क्लेशदायक आहे."

यावेळी अकमलने केवळ खेळाडूंनाच नाही, तर पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनाही लक्ष्य केले. आशिया चषक 2025 मध्ये भारताच्या विजयानंतर मोहसिन नकवी यांनी ट्रॉफी स्वतःसोबत नेल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावर खोचक टिप्पणी करताना अकमल म्हणाला की, "जर तुम्ही मैदानावर प्रतिस्पर्धी संघांना हरवू शकत नसाल, तर काय आता ट्रॉफी चोरुन घरी आणणार का?" नकवींच्या कार्यपद्धतीवर आणि पाकिस्तानी क्रिकेटच्या ढासळत्या स्तरावर अकमलने थेट हल्ला चढवला.

या मालिकेचा प्रवास पाकिस्तानसाठी (Pakistan) अत्यंत मानहानीकारक राहिला. 11 मार्च 2026 रोजी मीरपूरमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा संघ अवघ्या 114 धावांवर ढेपाळला होता. बांगलादेशने हा सामना 8 गडी राखून आणि 35 षटके राखून जिंकत पाकिस्तानला जमिनीवर आणले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने 128 धावांनी विजय मिळवून पुनरागमन केले आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली.

मात्र, 15 मार्च रोजी झालेल्या निर्णायक सामन्यात बांगलादेशच्या 290 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानी फलंदाजी पुन्हा एकदा गडगडली आणि संपूर्ण संघ 279 धावांवर बाद झाला. बांगलादेशने हा थरारक सामना 11 धावांनी जिंकून पाकिस्तानला मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला. या पराभवामुळे पाकिस्तान क्रिकेटमधील अंतर्गत कलह आणि सुमार कामगिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Amistad: व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु! हवाई दलाची विमानं 35 टनांपेक्षा जास्त मदतीसह रवाना

Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...डोळ्यांसमोर कोसळली घरं; रात्रभर नागरिक रस्त्यांवर VIDEO

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगापूर्वी मोठी गूड न्यूज! जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार? खिशात येणार बक्कळ पैसा

Goa Traffic Jam: मेरशी चौकात 'एआय'चा झाला पोपट! हायटेक सिग्नल यंत्रणेनं गोमंतकीयांचा केला खोळंबा; वाहनांच्या रांगाच रांगा

Goa Lake Protection: "तलाव बुजवला तर अख्खा परिसर पाण्यात बुडणार!", सॅटेलाईट फोटोंनी उघड केलं दवर्लीतील 'ते' गुपित

SCROLL FOR NEXT