PAK vs SL| video  Twitter
क्रीडा

PAK vs SL: आणीबाणीतही श्रीलंकेत पाकिस्तान टिमचे जल्लोषात स्वागत, पहा व्हिडिओ

Video: श्रीलंकेमध्ये बीकट परीस्थिती असुनही पाकिस्तान टिम कसोटी मालिका खेळणार आहे.

दैनिक गोमन्तक

श्रीलंकेत आर्थिक बिकट पस्थितीत असुनही पाकिस्तान टिम (Pakistan team) कसोटी मालिका खेळणार आहे. गुरुवारी हा संघ कोलंबोहून गाले येथे पोहोचला. गालेमध्येही पाक संघाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पाकिस्तानी संघ गाले येथील हॉटेलमध्ये पोहोचताच त्यांचे पारंपरिक श्रीलंकन ​​शैलीत स्वागत करण्यात आले. या स्वागताचा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, गाले विमानतळ सोडल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू बसमधून हॉटेलकडे निघाले आहेत. हॉटेलमध्ये जांभळ्या रंगाची फुले देऊन त्यांचे स्वागत केले जाते. यानंतर पारंपारिक नृत्य सादर करणारा समूह या खेळाडूंचे स्वागत करताना दिसत आहे.

यादरम्यान कॅप्टन बाबर आझम आणि मोहम्मद रिजवानही हॉटेलमध्ये दिवे लावताना दिसत आहेत. विशेष म्हणजे श्रीलंकेत (Sri Lanka) सध्या आणीबाणीची स्थिती आहे. येथील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीही राजीनामा दिला आहे. या सगळ्यात पाकिस्तानचा श्रीलंका दौरा धोक्यात आला होता पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मन वळवण्यात श्रीलंका क्रिकेटला (Cricket) यश आले. आता 16 जुलैपासून दोन्ही देशांदरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, अझहर अली, फहीम अश्रफ, फवाद आलम, हरिस रौफ, हसन अली, इमाम-उल-हक, मोहम्मद नवाज, नसीम शाह, नौमान अली, सलमान अली आगा, सर्फराज अहमद, सौद शकील, शाहीन आफ्रिदी, शान मसूद आणि यासिर शाह.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT