Pakistan Team Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2022 साठी पाकिस्तानचा संभाव्य संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली संधी

Pakistan Team: पाकिस्तानने 2022 च्या T20 विश्वचषकासाठी 15 जणांचा संभाव्य संघ जाहीर केला आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानने 2022 च्या T20 विश्वचषकासाठी 15 जणांचा संभाव्य संघ जाहीर केला आहे. या संघात वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीचाही समावेश आहे, जो दुखापतीमुळे 2022 आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला होता. याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या शान मसूदलाही संघात संधी देण्यात आली आहे.

त्याचबरोबर, सर्फराज अहमद, मोहम्मद हरिस, उस्मान कादिर आणि इफ्तिखार अहमद यांना राखीव खेळाडू म्हणून संघात ठेवण्यात आले आहे. तथापि, पीसीबीने म्हटले आहे की, टी-20 विश्वचषकासाठी अंतिम पूर्ण संघाची निवड इंग्लंडविरुद्धच्या सात सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर केली जाईल.

दुसरीकडे, श्रीलंकेने पाकिस्तानला धूळ चारत आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. श्रीलंकेने पाकिस्तानसमोर (Pakistan) विजयासाठी 171 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ही धावसंख्या गाठणे पाकिस्तानी संघाला शक्य झाले नाही. 20 षटकांमध्ये पाकिस्तानला केवळ 147 धावा करता आल्या. श्रीलंकेने (Sri Lanka) पाकिस्तानचा 23 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT