Pakistan Hockey Team  Dainik Gomantak
क्रीडा

'ऑस्ट्रेलियात आम्ही भांडी घासली!' लाहोरमध्ये पोहोचताच पाकिस्तानी कर्णधारानं मांडली व्यथा; पाकड्यांचा निलाजरेपणा पुन्हा जगासमोर उघड

Pakistan Hockey Team Captain Allegations: ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर लाहौर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना संघाचा कर्णधार शकील अम्माद भट याने पाकिस्तान हॉकी फेडरेशनवर गंभीर आरोप केले.

Manish Jadhav

Pakistan hockey captain statement : पाकिस्तानच्या राष्ट्रीय हॉकी संघाचा नुकताच झालेला ऑस्ट्रेलिया दौरा हा पाकिस्तानमधील क्रीडा प्रशासनाच्या दुरवस्थेचे सर्वात मोठे उदाहरण ठरला. एफआयएच प्रो लीगच्या दुसऱ्या टप्प्यासाठी गेलेल्या या संघाला मैदानावर तर पराभवाचा सामना करावा लागलाच, परंतु मैदानाबाहेर त्यांना ज्या अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागले, ते वाचून जगभरातील क्रीडाप्रेमी थक्क झाले आहेत. ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर लाहोर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना संघाचा कर्णधार शकील अम्माद भट याने पाकिस्तान हॉकी फेडरेशनवर गंभीर आरोप करत अनेक धक्कादायक खुलासे केले.

शकीलने अत्यंत उद्वेगाने सांगितले की, ऑस्ट्रेलियामध्ये पाकिस्तानी खेळाडूंना चक्क हॉटेलमधील भांडी घासावी लागली आणि स्वयंपाकघर साफ करावे लागले. खेळाडूंनी मॅच खेळायला जाण्यापूर्वी ही कामे केली, तर त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा कशी ठेवता येईल, असा संतप्त सवाल त्याने उपस्थित केला. इतकेच नाही तर फेडरेशनच्या नियोजनातील अभावामुळे खेळाडूंना कित्येक तास रस्त्यावर भटकावे लागले.

सिडनी विमानतळावर पुढील प्रवासासाठी खेळाडूंना 13-14 तास ताटकळत ठेवण्यात आले होते. जेव्हा संघ कॅनबेरा येथील हॉटेलवर पोहोचला, तेव्हा तिथे समजले की फेडरेशनने पैसे न भरल्यामुळे बुकिंगच झालेले नाही. अशा वेळी स्थानिक पाकिस्तानी नागरिकांनी मदत केली म्हणून खेळाडूंना डोक्यावर छप्पर मिळाले.

फेडरेशनने केवळ 10 दिवसांसाठी 'एअरबीएनबी' बुक केले होते, मात्र संघाला तिथे 13 दिवस मुक्काम करायचा होता. उर्वरित दिवसांसाठी खेळाडूंना कोणत्याही सुविधा नसलेल्या एका स्वस्त हॉटेलमध्ये हलवण्यात आले. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, पाकिस्तान क्रीडा बोर्डाने हॉटेलच्या खर्चासाठी फेडरेशनला 1 कोटी रुपयांहून अधिक निधी दिला होता, परंतु हा पैसा गेला कुठे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कर्णधाराने स्पष्ट शब्दांत सांगितले की, जोपर्यंत हे विद्यमान व्यवस्थापन बदलले जात नाही, तोपर्यंत खेळाडू खेळ सुरु ठेवू शकत नाहीत.

मैदानातील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, या सर्व मानसिक त्रासाचा परिणाम खेळावरही दिसून आला. पाकिस्तानला (Pakistan) ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीविरुद्धच्या सर्व सामन्यांत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी चौकशीचे आदेश दिले असून क्रीडा मंडळाकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. राष्ट्रीय खेळाडूंसोबत झालेल्या या वागणुकीमुळे संपूर्ण जगात पाकिस्तानच्या क्रीडा प्रशासनाची बदनामी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT