Naseem Shah Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023: सुपर-4 च्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीनं गेला मैदानातून बाहेर

Pakistan Team: बांगलादेशविरुद्ध आशिया चषकातील सुपर-4 चा पहिलाच सामना खेळताना पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला.

Pranali Kodre

Pakistan fast bowler Naseem Shah injured his left arm:

आशिया चषक 2023 स्पर्धेत बुधवारपासून सुपर-4 फेरीचे सामने सुरु झाले आहेत. या फेरीतील पहिला सामना बुधवारी पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात पार पडला. लाहोरला पार पडलेल्या या सामन्यात पाकिस्तान क्रिकेटला मोठा धक्का बसला.

पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज या सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. पण सुदैवाने तो उजव्या हाताने गोलंदाजी करत असल्याने गोलंदाजीदरम्यान समस्या उद्भवली नाही.

ही घटना सामन्याच्या 7 व्या षटकात घडली. त्यावेळी प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशकडून मोहम्मद नईम फलंदाजी करत होता, तर शाहिन आफ्रिदी गोलंदाजी करत होता.

या षटकातील दुसऱ्य चेंडूवर नईमने फाईन लेगला फटका मारला, जो आडवण्यासाठी नसीमने सूर मारला. त्यावेळी त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली. तो काहीवेळ त्याच्या हाताला धरून तसाच बसला.

त्यावेळी मोहम्मद रिझवानने लगेचच संघाच्या फिजिओथेरपिस्ट मैदानात बोलावले. त्यानंतर नसीम मैदानातून बाहेर गेला. दरम्यान, त्यानंतर तो पुन्हा मैदानात आला आणि त्याने गोलंदाजी केली.

मात्र, त्याची डाव्या हाताला झालेली दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पण जर दुखापत गंभीर असेल, तर पाकिस्तानसाठी मोठा धक्का ठरू शकतो. विशेषत: आगामी काही महत्त्वाच्या सामन्यांचा आणि वनडे वर्ल्डकपचा विचार करता पाकिस्तानला आशा असेल की नसीमची दुखापत गंभीर नसावी.

पाकिस्तानला सुपर-4 मध्ये भारताविरुद्ध 10 सप्टेंबर रोजी सामना खेळायचा आहे. हा सामना कोलंबोला होणार आहे.

दरम्यान, नसीमने बांगलादेशविरुद्ध 5.4 षटके गोलंदाजी करताना 34 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. दरम्यान बांगलादेशचा डाव 38.4 षटकातच संपुष्टात आला. त्यांच्याकडून कर्णधार शाकिब अल हसनने सर्वाधिक 53 धावांची खेळी केली. तसेच मुशफिकूर रहिमने 64 धावांची खेळी केली. याशिवाय मोहम्मन नईमने 20 धावा केल्या.

या व्यतिरिक्त कोणालाही 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही. पाकिस्तानकडून नसीम व्यतिरिक्त हॅरिस रौफने 4 विकेट्स घेतल्या, त्याचबरोबर शाहिन आफ्रिदी, फहिम अश्रफ आणि इफ्तिखार अहमद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT