Rohit Sharma & Babar Azam Dainik Gomantak
क्रीडा

ODI World Cup 2023: वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार, शाहबाज सरकाकडून ग्रीन सिग्नल

World Cup: पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या स्पर्धेसाठी आपला संघ भारतात पाठवण्याबाबत निवेदन दिले आहे.

Manish Jadhav

ODI World Cup 2023, India vs Pakistan: भारत यावर्षी एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. या आयसीसी टूर्नामेंटबाबत रविवारी पाकिस्तानकडून मोठी अपडेट आली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या स्पर्धेसाठी आपला संघ भारतात पाठवण्याबाबत निवेदन दिले आहे.

पाकिस्तानचा संघ भारतात येणार

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, त्यांचा संघ विश्वचषक खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर जाणार आहे.

यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) अधिकाऱ्यांसह अनेक माजी क्रिकेटपटूंनी यावर वक्तव्ये केली होती. आता परराष्ट्र मंत्रालयाने सर्व काही साफ केले आहे.

बहुप्रतिक्षित विश्वचषक सामना भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे. पाकिस्तान सरकारने अखेर 'मेन इन ग्रीन' ला ICC विश्वचषक-2023 साठी भारत दौऱ्यावर जाण्याची परवानगी दिली.

खेळ आणि राजकारण यांची सांगड घालू नये

परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, 'पाकिस्तानने सातत्याने सांगितले आहे की, खेळ आणि राजकारण यांची सांगड घालू नये. त्यामुळे आगामी आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये खेळण्यासाठी आम्ही आमचा क्रिकेट संघ भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, पाकिस्तानचा असा विश्वास आहे की भारतासोबतच्या द्विपक्षीय संबंधांची स्थिती त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा-संबंधित जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या मार्गावर येऊ नये.

सुरक्षेबाबत चिंता

मात्र, पाकिस्तान सरकारने आपल्या क्रिकेट संघाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. मंत्रालयाने म्हटले की, 'आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि भारतीय अधिकाऱ्यांना या चिंतेबद्दल अवगत केले आहे.

आम्हाला आशा आहे की, पाकिस्तान क्रिकेट संघाच्या भारत भेटीदरम्यान त्यांची संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित केली जाईल. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानच्या सहभागाबाबत स्थापन केलेल्या समितीने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी शिष्टमंडळ पाठवण्याचा विचार केल्यानंतर काही दिवसांनी हे विधान आले आहे.

आशिया चषकाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही

यापूर्वी, आशिया चषक स्पर्धेतील सहभागाबाबत बरेच वाद झाले होते. वास्तविक, आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले होते, पण भारताने (India) आपला संघ शेजारच्या देशात पाठवण्यास नकार दिला होता. नंतर भारताचे सामने आणि सेमीफायनल-फायनल श्रीलंकेत होणार हे निश्चित झाले.

जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, पाकिस्तान सुरक्षा शिष्टमंडळ पाठवण्यासाठी भारत आणि आयसीसीशी संपर्क साधेल, असेही सूत्रांनी सांगितले. शिष्टमंडळ पाठवण्याचे मान्य झाल्यास ते ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येईल, असे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT