Babar Azam Dainik Gomantak
क्रीडा

PAK vs NZ: बाबर आझमने रचला इतिहास, हाशिम आमलाचा मोडला ​​'वर्ल्ड रेकॉर्ड'

PAK vs NZ: बाबर आझम जगातील सर्वात जलद 5000 धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 19 धावा करताच दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी खेळाडू हाशिम आमलाचा ​​विक्रम मोडला.

Manish Jadhav

Babar Azam Record: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम एकापाठोपाठ एक रेकॉर्ड बनवत आहे. शुक्रवारी कराचीत खेळल्या जात असलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात त्याने एका मोठ्या विक्रमाची नोंद केली.

बाबर आझम जगातील सर्वात जलद 5000 धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 19 धावा करताच दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी खेळाडू हाशिम आमलाचा ​​विक्रम मोडला.

अमलाने त्याच्या शानदार वनडे कारकिर्दीत 101 डावात हा विक्रम केला होता. बाबरने 96 व्या डावात 4981 धावा केल्या होत्या. त्याने 97 व्या डावात 19 धावा करुन इतिहास रचला.

विवियन रिचर्ड्स आणि विराट कोहली यांनी 114 व्या डावात 5000 धावा केल्या

दरम्यान, सर्वात जलद 5 हजार धावा करण्याच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा दिग्गज विवियन रिचर्ड्स हाशिमनंतर दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांनी हा विक्रम 114 व्या डावात केला. त्याचबरोबर, स्टार फलंदाज विराट कोहलीनेही (Virat Kohli) 114 व्या डावात 5 हजार धावा पूर्ण केल्या. बाबरने या सर्व फलंदाजांना मागे सोडले.

सर्वात कमी डावात 5000 वनडे धावा

97 - बाबर आझम*

101 – हाशिम आमला

114 - विवियन रिचर्ड्स

114 – विराट कोहली

115 - डेव्हिड वॉर्नर

दुसरीकडे, सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पाकिस्तानचा संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरला. सलग दुसऱ्या सामन्यात फखर जमानला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. तो अवघ्या 14 धावा करुन बाद झाला.

तर शान मसूदने 44 धावा केल्या. या सामन्यात पाकिस्तानने (Pakistan) इमाम-उल-हक, नसीम शाह आणि शादाब खान यांना विश्रांती दिली आहे. त्याच्या जागी इफ्तिखार अहमद, मोहम्मद हरीस आणि उसामा मीर यांचा मधल्या फळीत प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT