Online National Junior Chess: Nitish Belurkar Dainik Gomantak
क्रीडा

Online National Junior Chess: गोव्याचा नीतिश बक्षीसप्राप्त खेळाडूंत

Online National Junior Chess: अखेरचे चार डाव जिंकून पहिल्या दहा खेळाडूंत स्थान

किशोर पेटकर

पणजीः गोव्याचा फिडे मास्टर (Fide Master) बुद्धिबळपटू नीतिश बेलुरकर (Nitish Belurkar) याने ऑनलाईन राष्ट्रीय ज्युनियर बुद्धिबळ (Online National Junior Chess) स्पर्धेत बक्षीसप्राप्त खेळाडूंत स्थान मिळविले. त्याने आठ गुणांची कमाई करत नववा क्रमांक मिळविला. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत नीतिशने पहिले चारही डाव जिंकून दणक्यात सुरवात केली. मात्र पाचव्या डावात त्याला गोव्यातील जोरदार पावसाचा फटका बसला. इंटरनॅशनल मास्टर अरण्यक घोष याच्याविरुद्धचा डाव सुरू असताना 23 जुलैला गोव्यात झालेल्या पावसामुळे नीतिशचे इंटरनेट कनेक्शन कोलमडले. त्याचा परिणाम त्याच्या एकाग्रतेवर होऊन तो पराभूत झाला. मात्र अखेरचे चार डाव जिंकून त्याने पहिल्या दहा खेळाडूंत स्थान मिळविले.

नीतिश एस. एस. धेंपो महाविद्यालयाचा विद्यार्थी असून जीनो फार्मास्युटिकल्सचा सदिच्छा दूत आहे. राष्ट्रीय ऑनलाईन ज्युनियर स्पर्धेतील चमकदार कामगिरीबद्दल गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष वीजमंत्री नीलेश काब्राल, सचिव किशोर बांदेकर यांनी नीतिशचे अभिनंदन केले आहे. स्पर्धेत तमिळनाडूच्या व्ही. एस. राहुल याने विजेतेपद मिळविले. गोव्यातील अन्य खेळाडूंत आयुष शिरोडकर याला साडेसहा गुणांसह 44वा, जॉय काकोडकर याला साडेपाच गुणांसह 95वा क्रमांक मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

SCROLL FOR NEXT