Hyderabad FC

 

Dainik Gomantak 

क्रीडा

Indian Super League: विजयी धडाक्यासह हैदराबादची प्रगती

फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात मंगळवारी विजयी धडाक्यासह प्रगती साधली. त्यांनी ओडिशा एफसीचा (Odisha FC) 6-1 फरकाने धुव्वा उडवून गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी उडी घेतली.

किशोर पेटकर

पणजी: नायजेरियन आघाडीपटू बार्थोलोम्यू ओगबेचे याचे दोन गोल, तसेच सामन्यावरील पूर्ण वर्चस्व यामुळे हैदराबाद एफसीने इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात मंगळवारी विजयी धडाक्यासह प्रगती साधली. त्यांनी ओडिशा एफसीचा 6-1 फरकाने धुव्वा उडवून गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी उडी घेतली.

हैदराबादचे पूर्ण वर्चस्व राहिलेला सामना बांबोळी येथील एथलेटिक स्टेडियमवर झाला. हैदराबाद संघ विश्रांतीला 2-1 फरकाने आघाडीवर होता. मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघ आता सलग सात सामने अपराजित आहे. त्यांनी चार सामने जिंकले असून तीन बरोबरी नोंदविल्या आहेत. एकंदरीत हैदराबाद एफसीचे आठ लढतीनंतर 15 गुण झाले असून अव्वल स्थानावरील मुंबई सिटीपेक्षा एक गुण कमी आहे. ओडिशाला चौथा पराभव पत्करावा लागला. आठ लढतीनंतर त्यांचे दहा गुण आणि सातवा क्रमांक कायम राहिला.

हेक्टर रोडास रमिरेझ याच्या स्वयंगोलमुळे हैदराबादला नवव्या मिनिटास आघाडी मिळाली. त्यानंतर 16व्या मिनिटास हैदराबादच्या हुआनन यानेही स्वयंगोल केल्यामुळे ओडिशाला 1-1 अशी बरोबरी साधता आली. 39व्या मिनिटास भेदक हेडिंग साधत ओगबेचे याने हैदराबादला आघाडी मिळवून दिली आणि नंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 54व्या मिनिटास एदू गार्सिया याने, तर 60व्या मिनिटास ओगबेचे याने आणखी एक गोल केला. नंतर 72व्या मिनिटास बदली खेळाडू हावियर सिव्हेरियो याने गोल केल्यानंतर जुवाव व्हिक्टर याने 86व्या मिनिटास पेनल्टी फटका अचूक मारत हैदराबादच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले.

गोल्डन बूटच्या शर्यतीत ओगबेचे आघाडीवर

आयएसएल (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात सर्वाधिक गोल (गोल्डन बूट) शर्यतीत 37 वर्षीय नायजेरियन आघाडीपटू बार्थोलोमेव ओगबेचे याने आघाडी घेतली आहे. हैदराबादच्या स्ट्रायकरने 8 लढतीतून 8 गोल केले आहेत. त्याने मुंबई सिटीच्या इगोर आंगुलो याला एका गोलने मागे टाकले. एकंदरीत 65 आयएसएल सामन्यात ओगबेचे याने 43 गोल नोंदविले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT