Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: हिटमॅन बांगलादेशविरुद्ध रचणार इतिहास, डिव्हिलियर्सला सोडणार मागे!

World Cup 2023 News: टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा विश्वचषकात इतिहास रचण्याच्या जवळ पोहोचला आहे.

Manish Jadhav

World Cup 2023 News: टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा विश्वचषकात इतिहास रचण्याच्या जवळ पोहोचला आहे. 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात कर्णधार रोहित शर्माने आणखी 4 षटकार मारले तर तो एक मोठा विक्रम आपल्या नावावर करेल.

भारत आणि बांगलादेश यांच्यात विश्वचषक 2023 चा सामना गुरुवार 19 ऑक्टोबर रोजी पुण्यातील MCA स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा खूप खास आणि मोठी कामगिरी करेल.

हिटमॅन' विश्वचषकात इतिहास रचण्याच्या जवळ

भारताचा (India) विस्फोटक सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्माने 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात आणखी 4 षटकार मारले तर तो एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सला मागे टाकेल. एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेल अव्वल स्थानावर आहे.

डिव्हिलियर्सला मागे टाकून हा मोठा विक्रम करेल

सध्या या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने 37 षटकार ठोकले होते. या यादीत सध्या भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात रोहितने आतापर्यंत 34 षटकार ठोकले आहेत. जर रोहितने बांगलादेशविरुद्ध 19 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विश्वचषक सामन्यात आणखी 4 षटकार मारले तर तो एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर पोहोचेल.

एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज

1. ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) – 49 षटकार

2. एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) – 37 षटकार

3. रोहित शर्मा (भारत) – 34 षटकार

4. रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – 31 षटकार

5. ब्रेंडन मॅक्क्युलम (न्यूझीलंड) - 29 षटकार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT