Pakistan Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

ODI World Cup 2023: पाकिस्तान संघासाठी मोठी बातमी, भारत सरकारने घेतला 'हा' निर्णय

ODI World Cup 2023: वनडे वर्ल्ड कप 2023 साठी पाकिस्तानी संघाला भारताचा व्हिसा मिळाला आहे.

Manish Jadhav

ODI World Cup 2023: वनडे वर्ल्ड कप 2023 साठी पाकिस्तानी संघाला भारताचा व्हिसा मिळाला आहे. अनेक दिवसांपासून पाकिस्तानला व्हिसा न मिळणे हा मोठा प्रश्न होता, मात्र आज (25 सप्टेंबर) पाकिस्तान संघाला व्हिसा मिळाला.

पाकिस्तानी संघ 27 ऑगस्टला वर्ल्ड कपसाठी हैदराबादला पोहोचणार आहे. अशा परिस्थितीत संघाकडे भारतात येण्यासाठी आता फक्त दोन दिवस उरले आहेत.

पाकिस्तानशिवाय भारताने अफगाणिस्तानलाही व्हिसा दिला आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघ कधीही भारतात पोहोचू शकतात.

बाबरला आपली योजना बदलावी लागली

पाकिस्तानला (Pakistan) व्हिसा न मिळाल्याने पीसीबीने आयसीसीकडे तक्रार केली होती. पीसीबीने म्हटले होते की, वर्ल्ड कपचे दिवस जवळ येत आहेत, मात्र अद्याप पाकिस्तानला व्हिसा देण्यात आलेला नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या प्रॅक्टिसवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पाकिस्तानला भारताकडून लवकरात लवकर व्हिसा देण्यात यावा.

या तक्रारीनंतर आज म्हणजेच सोमवारी पाकिस्तानला व्हिसा मिळाला. व्हिसा मिळण्यास उशीर झाल्यामुळे बाबर आझमला त्याच्या नियोजनातही बदल करावा लागला.

बाबरने 22 सप्टेंबर रोजी दुबईला जाण्याचा आणि त्यानंतर तेथून विमानाने भारतात जाण्याचा बेत आखला होता, मात्र व्हिसा मिळण्यास उशीर झाल्याने बाबरची ही योजना फसली आणि दुबईला जाण्याचा बेत रद्द करावा लागला.

14 ऑक्टोबरला भारतासोबत पाकिस्तानचा सामना होणार आहे

पाकिस्तानला 27 ऑगस्टला हैदराबादला (Hyderabad) पोहोचायचे आहे. या दिवशी त्याला पहिला सराव सामना खेळायचा आहे. त्याचबरोबर या वर्ल्ड कप पाकिस्तानचा पहिला सामना 6 सप्टेंबर रोजी नेदरलँड्ससोबत होणार आहे.

या सगळ्यांशिवाय जगभर ज्या सामन्यावर लक्ष असेल तो भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना 14 ऑक्टोबरला होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

AC Compressor Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

SCROLL FOR NEXT