Netherlands Team  Dainik Gomantak
क्रीडा

NZ Vs NED: नेदरलँड्सच्या गोलंदाजांची कमाल, किवी फलंदाजांना पहिली 3 षटके मेडन टाकून केला मोठा कारनामा

ODI World Cup 2023: आयसीसी विश्वचषक 2023 चा सहावा सामना न्यूझीलंड आणि नेदरलँड यांच्यात खेळला जात आहे.

Manish Jadhav

ODI World Cup 2023: आयसीसी विश्वचषक 2023 चा सहावा सामना न्यूझीलंड आणि नेदरलँड यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून नेदरलँड्सने न्यूझीलंडला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

दरम्यान, नेदरलँडच्या गोलंदाजांनी मोठा विक्रम केला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, न्यूझीलंडचा संघ पहिल्या 3 षटकात एकही धाव काढू शकला नाही. पहिल्या तीन षटकांनंतर किवी संघाची धावसंख्या शून्य विकेट्सवर शून्य अशी होती.

दरम्यान, विश्वचषकात (World Cup) अशा प्रकारची गोलंदाजी कौतुकास्पद आहे. त्याच्यातही किवीजसारखा धोकादायक संघ जर फलंदाजी करत असले तर नेदरलँड्सच्या गोलंदाजांसाठी लागोपाठ 3 मेडन ओव्हर्स काढणे सोपे काम नाही.

नेदरलँडसाठी पहिले षटक आर्यन दत्तने टाकले होते, दुसरे षटक रायन क्लेनने टाकले आणि तिसरे षटक पुन्हा एकदा आर्यन दत्तने टाकले, तिन्ही षटके मेडन गेली.

किवी संघाकडून डेव्हॉन कॉनवे आणि विल यंग सलामीला आले. मात्र, तीन षटकांनंतर दोन्ही फलंदाजांनी फटकेबाजी केली, तीन षटकांत शून्य धावसंख्या असलेला स्कोर 7 षटकांत 63 धावांवर पोहोचला.

याआधी हा पराक्रम न्यूझीलंडने केला

या शानदार गोलंदाजीच्या कामगिरीने एका दशकानंतर एका एकदिवसीय सामन्यात सलग तीन मेडन षटके टाकण्याचा विक्रम नेदरलंड्सने केला आहे. विशेष म्हणजे, असा पराक्रम न्यूझीलंडने (New Zealand) 2013 मध्ये किम्बर्ले येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केला होता.

त्यानिमित्ताने किवी संघाने 27 धावांनी सामना जिंकला होता. सुरुवातीच्या तीन ओव्हर मेडन गेल्यानंतर डेव्हॉन कॉनवे आणि विल यंग यांनी तूफानी फटकेबाजी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sreesanth: "भज्जीनं थप्पड कांड विकलं!" श्रीसंतचा हरभजन सिंहवर कोट्यवधींच्या कमाईचा आरोप; क्रिकेट जगतात खळबळ

Bank Robbery: 10 मिनिटात 7 कोटींचं सोनं आणि 5 लाखांची रोकड केली लंपास! झारखंडमध्ये बँकेवर दरोडेखोरांचा छापा; कर्मचारी-ग्राहकांना ठेवलं ओलीस

Budh Gochar 2026: "धनाचा पाऊस अन् सुखाची बरसात!" 30 एप्रिलपासून 5 राशींची होणार चांदी; बुधाच्या गोचरमुळे चमकणार भाग्य

IPL 2026 Points Table: "आरसीबीचा 'विराट' विजय!" गुजरातला नमवून गुणतालिकेत पटकावलं दुसरं स्थान; प्ले-ऑफच्या दिशेनं आगेकूच

लग्नावरुन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला! भीषण अपघातात पती-पत्नीसह 5 जणांचा मृत्यू; एका निष्पाप प्राण्यानेही गमावला जीव

SCROLL FOR NEXT