Matt Henry  Dainik Gomantak
क्रीडा

NZ vs AUS: मॅट हेन्रीची धाकड गोलंदाजी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध घेतल्या 7 विकेट्स

NZ vs AUS: ऑस्ट्रेलियाला या धावसंख्येवर बाद करण्यात किवी संघाचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरली, ज्याने घातक गोलंदाजीने कांगारु फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

Manish Jadhav

NZ vs AUS: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा संघ 162 धावांत सर्वबाद झाला, तर दुसरीकडे कांगारु संघाची अवस्थाही बिकट झाली. ऑस्ट्रेलियन संघही पहिल्या डावात 256 धावा करु शकला आणि पहिल्या डावात 94 धावांची आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियाला या धावसंख्येवर बाद करण्यात किवी संघाचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरली, ज्याने घातक गोलंदाजीने कांगारु फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात हेन्रीने 23 षटकात 67 धावा देऊन 7 बळी घेतले आणि यादरम्यान त्याने 4 मेडन षटके टाकली. हेन्रीने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याला पहिल्या डावात आपला पहिला बळी बनवले आणि 16 धावांवर क्लीन बोल्ड केले. या विकेटनंतर त्याने झटपट विकेट घेतल्या आणि त्यानंतर कॅमेरुन ग्रीनला 25 धावांवर बाद केले. हेन्रीचा तिसरा बळी ठरला तो ट्रॅव्हिस हेड ज्याने 21 धावांची खेळी खेळली आणि तो झेलबाद झाला.

दुसरीकडे, या सामन्यात पुन्हा मॅट हेन्रीने नॅथन लायनला 20 धावांवर बाद करत ट्रॅव्हिस हेडला शून्यावर बाद करुन पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर हेन्रीने मिचेल स्टार्कला 28 धावांवर बाद केले तर कर्णधार पॅट कमिन्स 23 धावांवर बाद झाला. हेन्रीचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील हा सर्वोत्तम स्पेल होता, तर या संघाविरुद्ध दुसऱ्यांदा पाच विकेट घेण्याचा चमत्कार त्याने केला. कांगारु संघाविरुद्ध पहिल्या डावात किवी संघाकडून हेन्रीशिवाय टीम साऊदी, बेन सियर्स आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Children Kidnap Case: मुले आरोपी रोहित आर्यच्या जाळ्यात नेमकी कशी अडकली? धक्कादायक घटनेची A टू Z कहाणी

Goa Crime: पेडणे गोळीबार घटनेला मोठे वळण! तेरेखोल नदीतील अवैध वाळू उपसा प्रकरणी 7 जणांना अटक

Viral Video: अंगावर चिखल उडवणाऱ्या कारचालकाची तरुणीनं मोडली चांगलीच खोड; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, 'भावाने चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला...'

अंधाऱ्या रात्रीत डिव्हायडरजवळ पडला, दारूच्या नशेत उठणंही होतं मुश्किल; 'बिट्स पिलानी'च्या विद्यार्थ्याचा राडा

Vellim Church Attack: 13 वर्षांनंतर ऐतिहासिक निकाल! वेळ्ळी चर्च हल्ला प्रकरणातील सर्व 22 संशयितांची निर्दोष मुक्तता; मडगाव कोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT