Babar Azam Dainik Gomantak
क्रीडा

Pakistan Cricket: ''बाबर आझमच्या बॅटिंग ऑर्डरबाबत...''; नवा कसोटी कर्णधार शान मसूद असं का म्हणाला?

New Test Captain Shan Masood: आयसीसी विश्वचषक 2023 पासून पाकिस्तान क्रिकेट संघात मोठे बदल झाले आहेत.

Manish Jadhav

New Test Captain Shan Masood: आयसीसी विश्वचषक 2023 पासून पाकिस्तान क्रिकेट संघात मोठे बदल झाले आहेत. बाबर आझमने कर्णधारपद सोडले, त्यानंतर शान मसूदला कसोटी संघाचा तर शाहीन शाह आफ्रिदीला टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले.

पाकिस्तान क्रिकेट संघाला पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे, जिथे त्यांना तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. कसोटी मालिकेपूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाला प्राइम मिनिस्टर्स XI विरुद्ध चार दिवसीय सराव सामनाही खेळायचा आहे.

ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी पाकिस्तानचा कसोटी कर्णधार शान मसूद पत्रकार परिषदेत सहभागी झाला आणि यादरम्यान त्याने काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली. शान मसूदने सांगितले की, कसोटी संघातील बाबर आझमच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये सांगितले.

शान मसूद म्हणाला की, ''इमाम उल हक आणि अब्दुल्ला शफीक यांनी पाकिस्तानसाठी (Pakistan) चांगली कामगिरी केली आहे, या दोघांनीही एका वर्षाहून अधिक काळ चांगली कामगिरी केली आहे. आम्ही आमच्या सलामीच्या जोडीसोबत जाऊ, मी गेल्या काही काळापासून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे.

मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये या क्रमांकावर फलंदाजी करतो, त्यामुळे मी याच क्रमांकावर फलंदाजी करेन. ही आमची योजना आहे, बाबर आझम आमचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे आणि कोणीही त्याच्या क्रमांक-4 फलंदाजीच्या स्थितीबाबत अडसर ठरणार नाही. तुम्ही नेहमी तुमच्या सर्वोत्तम फलंदाजाभोवती तुमचा संघ तयार करता.''

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघ आयसीसी विश्वचषक 2023 च्या साखळी फेरीतूनच बाहेर पडला. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याचा दावेदार मानला जात होता, पण पाकिस्तानी संघ साखळी फेरीत न्यूझीलंड (New Zealand) वगळता अन्य कोणत्याही मोठ्या संघाला पराभूत करु शकला नाही. यानंतर बाबरने कर्णधारपद गमावले.

मोहम्मद हाफिजला पाकिस्तान क्रिकेटचे संचालक करण्यात आले. उमर गुल हा पाकिस्तान संघाचा नवा गोलंदाज प्रशिक्षक बनला, तर सईद अजमल हा नवा स्पिन कोच आहे. अॅडम हॉलीओक यांची पाकिस्तानचे नवे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT