Nhaveli Cricket Team

 

Dainik gomantak

क्रीडा

न्हावेलीच्या 'विविधा'ला क्रिकेटचे जेतेपद, संघाने पटकावले विजेतेपद

अंतिम सामन्यात या संघाने शिरगाव स्पोर्ट्स क्लब संघावर मात केली

दैनिक गोमन्तक

डिचोली : मये युनियन स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत न्हावेलीच्या विविधा स्पोर्ट्स क्लब संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात या संघाने शिरगाव स्पोर्ट्स क्लब संघावर मात केली. विजेत्या संघाला चषक आणि रोख 60 हजार रुपये, तर उपविजेत्या संघाला चषक आणि रोख 30 हजार रुपये प्राप्त झाले. गावळान-मये येथील मैदानावर आयोजित केलेल्या या स्पर्धेत 24 संघ सहभागी झाले होते.

सामनावीर म्हणून पद्मानंद गावस (विविधा), मालिकावीर म्हणून विश्वतेज वायंगणकर (शिरगाव) उत्कृष्ट फलंदाज आणि खेळाडू म्हणून समर्थ गावस (विविधा) यांना वैयक्तिक बक्षिसे प्राप्त झाली. बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहूणे म्हणून मयेचे आमदार (MLA) प्रवीण झांट्ये उपस्थित होते. यावेळी क्लबचे अध्यक्ष तथा स्थानिक पंच तुळशीदास चोडणकर, माजी सरपंच (Sarpanch) सुभाष किनळकर, पत्रकार तुकाराम सावंत, दयानंद राऊळ, जीसीएचे पंच प्रशांत गडेकर आणि विशाल अमोणकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे वितरीत करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT