Key and Keyt Alves | Neymar Dainik Gomantak
क्रीडा

Neymar Jr: 'मी एकाच वेळी दोघींनाही डेट करु शकतो', जुळ्या बहिणींना आक्षेपार्ह मेसेज केल्याने फुटबॉलपटू गोत्यात

नेमार एकाचवेळी व्हॉलिबॉलपटू असलेल्या जुळ्या बहिणींबरोबर डेटिंगचा प्रयत्न करत असल्याचा त्याच्यावर आरोप झाला आहे.

Pranali Kodre

Neymar Jr: ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. जगभरात त्याचे चाहते आहेत. मात्र, नुकताच तो मैदानाबाहेर त्याने केलेल्या एका कृतीमुळे तो चर्चेत आला आहे. ब्राझीलच्याच व्हॉलिबॉल खेळाडू असलेल्या जुळ्या बहिणींनी त्याच्यावर दोघींबरोबरच एकाचवेळी रिलेशन ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

कि आणि केट एल्व्हज या जुळ्या बहिणींबरोबर रिलेशनशीप ठेवण्याचा नेमार प्रयत्न करत असल्याचा आरोप झाला आहे. कि आणि केट या दोघीही लोकप्रिय व्हॉलिबॉल खेळाडू आहेत. त्यांना सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोइंग आहे. की हिचे ओन्लीफॅन्स अकाऊंटही आहे, ज्यातून ती मोठी कमाई देखील करते.

दरम्यान, सांबा स्टार मार्वविलाबरोबर बोलताना 23 वर्षीय कि हिने नेमार दोघी बहिणींना इंस्टाग्रामवरून मेसेज करत असल्याचे सांगितले. ती म्हणाली, 'तुम्हाला महितीये का तो (नेमार) कुठे घसरला. तो माझी जुळी बहीण रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी तो तिच्याशी गप्पा मारत होता. त्यानंतर तिने डेटिंग चालू केले आणि मग याने बोलणे बंद केले. त्यानंतर त्याने काय केले, त्याने मला मेसेज केला, जसे काही आम्ही दोघींनी त्याच्याशी बोलण्याबाबत एकमेकींशी कधी चर्चाच केली नसेल.'

त्यानंतर, एका बहिणीने त्याला त्याच्या मनात काय असेल, ते सांगण्यास सांगितल्यानंतर तो म्हणाला, 'कोणाला माहिती, कदाचीत, मला तुम्ही दोघीही भेटाल', याबद्दलही कि हिने माहिती दिली.

तसेच कि पुढे म्हणाली, 'माझी बहिण आणि मी, आम्ही दोघीही प्रत्येक गोष्ट एकमेकींशी बोलतो. त्याने खरंच असा विचार केला का, की मी त्याच्याबद्दल तिच्याशी बोलणार नाही. जर त्याने तिला मेसेज केला नसता आणि फक्त मला केला असता, तर मी कधीच पॅरिसमध्ये पोहचले असते, असं तुम्हाला वाटत नाही का?'

दरम्यान, कि ही सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. तसेच ती ओन्लीफॅन्स अकाऊंटवरूनही मोठी कमाई करत आहे. याबद्दल तिने सांगितले की 'मला आवडू की नाही, यातून मी मोठी कमाई करते. मी व्हॉलिबॉलपेक्षा 50 पट अधिक कमाई डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरून करते. बहुतेक कमाई ओन्लीफॅन्सवरून होते, कारण महिन्याला 16 युरोज येणार हे निश्चित असते.'

याशिवाय तिने असेही सांगितले की कोणतेही अक्षेपार्ह पोस्ट ती ओन्लीफॅन्स पेजवर करत नाही.

नेमारबद्दल सांगायचे झाल्यास तो सध्या पॅरिस सेंट-जर्मेन संघात आहे. पण नुकतीच त्याला घोट्याची दुखापत झाली आहे. त्यामुळे पुढील काही सामन्यांसाठी त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT