Pranali Kodre
क्रीडा क्षेत्रासाठी 5 फेब्रुवारी ही तारीख खुपच खास आहे.
5 फेब्रुवारीला अनेक बड्या खेळाडूंचा वाढदिवस असतो.
पोर्तुगालचा फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो याचाही जन्म 5 फेब्रुवारी 1985 रोजी झाला होता.
आज रोनाल्डो दिग्गज फुटबॉलर्समध्ये गणला जातो. त्याची लोकप्रियताही जगभरात आहे.
तसेच ब्राझीलचा स्टार फुटबॉलर नेमार ज्यूनियर याचा देखील 5 फेब्रुवारीला वाढदिवस असतो. त्याचा जन्म 1992 साली झाला होता
याशिवाय भारताचा स्टार वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचाही 5 फेब्रुवारी वाढदिवस असतो.
भुवनेश्वरचा जन्म मेरठमध्ये 1990 साली झाला होता.
युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याचाही जन्म 5 फेब्रुवारी 1999 रोजी झाला आहे.
न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटर मिशेल सँटेनरही 5 फेब्रुवारीला वाढदिवस साजरा करत असून त्याचा जन्म 1992 साली झाला आहे.