Ejaz Patel Dainik Gomantak
क्रीडा

टीम इंडियाला हरवण्यासाठी न्यूझीलंडचा 'भारत वाला' खेळाडू उतरणार मैदानात

कानपूर (Kanpur) कसोटीत भारताचे खेळाडू न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) खेळताना दिसतील, मात्र भारताचा एक खेळाडू न्यूझीलंड संघासोबत खेळतानाही दिसणार आहे.

दैनिक गोमन्तक

कानपूर (Kanpur) कसोटीत भारताचे खेळाडू न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) खेळताना दिसतील, मात्र भारताचा एक खेळाडू न्यूझीलंड संघासोबत खेळतानाही दिसणार आहे. कानपूरच्या खेळपट्टीचा मूड पाहता किवी कर्णधार केन विल्यमसन (Ken Williamson) त्याला ही संधी देऊ शकतो. किवी फिरकीपटू एजाज पटेल, (Ejaz Patel) ज्याचा जन्म भारतात झाला असून त्याला भारताच्या त्याच संघाविरुद्ध विजयाचा झेंडा फडकवायचा आहे. कानपूरमधील पहिल्या कसोटीपूर्वी एजाज पटेलने सांगितले की, मी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि टीम इंडियाच्या (Team India) आव्हानासाठी सज्ज आहे.

एजाज पटेल जूनपासून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गोलंदाजीपासून दूर आहे. आता त्याला भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडच्या कसोटी संघात स्थान मिळाले आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर पेलल्या जाणाऱ्या आव्हानाबाबत तो म्हणाला, भारताविरुद्ध खेळण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. भारत हा फिरकीविरुद्ध मजबूत संघ आहे हे आम्हाला माहीत आहे. भारताला घरच्या मैदानावर पराभूत करणे किती कठीण आहे, हे आम्हाला माहीत आहे. हा दौरा माझ्यासाठी फिरकी गोलंदाज म्हणून मोठे आव्हान असेल. मी या आव्हानासाठी तयार आहे. ही मालिका सुरु होण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.

मेहनत फळाला येईल अशी आशा - पटेल

न्यूझीलंडसाठी 9 कसोटीत 26 विकेट घेणारा एजाज पटेल म्हणाला, "भारतात एसजी चेंडूने गोलंदाजी करणे हे परदेशी गोलंदाजांसाठी मोठे आव्हान आहे. हे खूप कठीण आहे. त्याचा मूड ड्यूक बॉलसारखा आहे. यावर पकड चांगली बनवली आहे.” तो पुढे म्हणाला की, आमची तयारी चांगली झाली आहे. आम्ही खूप प्रवास केला आहे. परंतु या काळात आम्हाला सराव करण्याची आणि परिस्थिती अंगवळणी पडण्याची खूप संधी मिळाली आहे. आशा आहे की, आमची मेहनत फळाला येईल."

न्यूझीलंड ही फिरकी जोडी कानपूरमध्ये उतरु शकते

एजाज पटेल आणि विल सोमरविले ही फिरकी जोडी कानपूरमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटीत मैदानात उतरताना दिसू शकते. सोमरव्हिलसोबतच्या भागीदारीबाबत एजाज पटेल म्हणाला, “आमची जोडी चांगली आहे. माझे चेंडू कमी स्किड असताना सोमरविलेला बाउन्स आणि उंची आहे." कानपूरच्या ग्रीन पार्कवर न्यूझीलंडने आतापर्यंत एकही कसोटी जिंकलेली नाही. याआधी येथे खेळल्या गेलेल्या 3 कसोटी सामन्यांत तो 2 वेळा पराभूत झाला आहे. तर 1 कसोटी अनिर्णित राहिली आहे. अशा स्थितीत इतिहास उलगडून दाखवण्याची एजाज पटेलची भूमिका किवी संघासाठी आश्चर्यकारक ठरु शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT