Kane Williamson Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: न्यूझीलंडने केली विजयाची 'हॅट्ट्रिक', बांगलादेशला हरवून गाठले अव्वल स्थान

World Cup 2023: आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या 11 व्या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा 8 गडी राखून पराभव केला आहे.

Manish Jadhav

World Cup 2023: आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या 11 व्या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा 8 गडी राखून पराभव केला आहे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा हा सलग तिसरा विजय आहे.

यापूर्वी संघाने इंग्लंड आणि नेदरलँड्सचा पराभव केला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 50 षटकांत 9 गडी गमावून 245 धावा केल्या.

प्रत्युत्तरात केन विल्यमसन आणि डॅरिल मिशेलच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंड संघाने बांगलादेशचा 43 चेंडू बाकी असताना 8 गडी राखून पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

दरम्यान, 246 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. रचिन रवींद्र 13 चेंडूत 9 धावा करुन बाद झाला. 12 धावांवर किवी संघाची पहिली विकेट पडली.

केन विल्यमसनने (Kane Williamson) डेव्हॉन कॉनवेसह डाव सांभाळला आणि दोघांमध्ये 80 धावांची भागीदारी झाली. कॉनवे 59 चेंडूत 45 धावा करुन बाद झाला.

यानंतर, डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन यांच्यात शतकी भागीदारी झाली, परंतु 78 धावावर असताना विल्यमसन रिटायर्ड हर्ट झाला. यानंतर डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप यांनी विकेट पडू दिली नाही आणि संघाला विजयापर्यंत नेले.

दुसरीकडे, प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने (Bangladesh) 50 षटकांत 9 गडी गमावून 245 धावा केल्या. बांगलादेशकडून यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने सर्वाधिक 66 धावा केल्या. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक तीन बळी घेतले.

प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. लिटन दास पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर तनजीद 16 धावा करुन बाद झाला. मेहदी हसन मिराज 30 धावा करुन बाद झाला. शांतोला केवळ 7 धावा करता आल्या.

यानंतर शाकिब आणि मुशफिकुरने डावाची धुरा सांभाळली आणि दोघांमध्ये 90 हून अधिक धावांची भागीदारी झाली. शाकिब अल हसनने 51 चेंडूत 40 धावा केल्या. रहीमला 75 चेंडूत केवळ 66 धावा करता आल्या.

महमुदुल्लाहने शेवटच्या षटकांमध्ये मोठे फटके खेळले आणि 49 चेंडूत 41 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. तर न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल 89 आणि ग्लेन फिलिप 16 धावांवर नाबाद राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT