T-20 World Cup 2022 Dainik Gomantak
क्रीडा

T-20 World Cup 2022: गतविजेच्या ऑस्ट्रेलियावर न्युझीलंडची 89 धावांनी मात; पहिल्याच सामन्यात यजमान पराभूत

न्युझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवॉयची नाबाद 92 धावांची खेळी

गोमन्तक डिजिटल टीम

T 20 World Cup 2022: टी-20 वर्ल्डकपच्या सुपर 12 फेरीतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने यजमान ऑस्ट्रेलियाला 89 धावांनी पराभूत केले. डेवॉन कॉनवॉयच्या नाबाद 92 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने 20 षटकात 3 बाद 200 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात खेळताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव 111 धावात गुंडळाला गेला. मिचेल सँटनर आणि टीम साऊदीने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

गेल्या काही दिवसात पात्रता फेरी पार पडल्यानंतर आता विश्वचषकातील मुख्य लढतींना सुरवात झाली आहे. सुपर-12 गटातील पहिला सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या प्रतिस्पर्ध्यांमध्ये झाला.

न्युझीलंडचे मोठे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचे 4 फलंदाज 50 धावातच गारद झाले. त्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची मधली फळीही कापुन काढत त्यांची अवस्था 7 बाद 89 अशी केली. भरवशाचा मॅक्सवेल देखील 20 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. सँटनरने कर्णधार फिंचला 13 तर टीम साऊदीने शॉन मार्शला 16 धावांवर बाद करत कांगारूंची टॉप ऑर्डर पॅव्हेलियनमध्ये धाडली.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्युझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवॉयच्या नाबाद 92 धावांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने 20 षटकात 3 बाद 200 धावा केल्या. कॉनवॉयने 58 चेंडूत नाबाद 92 धावा केल्या. त्याला साथ देणाऱ्या जेमी नीशमने 13 चेंडूत 26 धावा केल्या. निशमने 200 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

त्याने हेजलवूडला शेवटच्या चेंडूवर षटाकर मारत न्यूझीलंडला 200 धावांपर्यंत पोहचवले. तर सलामीवीर फिन एलनने 16 चेंडूत 42 धावा चोपल्या. त्यानेही कांगारूंची 262.50 च्या स्ट्राईक रेटने धुलाई केली. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूडने 2 तर झाम्पाने 1 विकेट घेतली.

भारत विरूद्ध पाकिस्तान सामना उद्या

दरम्यान, टी-20 विश्वचषकातील महत्वाचा महामुकाबला उद्या, रविवारी भारत-पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणार आहे. दुपारी दीड वाजता मेलबोर्न क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT