Kane Williamson - Tim Southee X/ICC
क्रीडा

Kane Williamson: न्यूझीलंडला धक्का! T20I मालिकेतून कर्णधारच झाला बाहेर, 'या' खेळाडूला संधी

Pranali Kodre

New Zealand Captain Kane Williamson ruled out of the remainder of T20 Series against Pakistan:

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात सध्या टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने पूर्ण झाले असून दोन्ही सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. पण आता न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन पाकिस्तानविरुद्धच्या टी२० मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून बाहेर झाला आहे. त्याला या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात खेळत असताना हॅमस्ट्रिंगची समस्या जाणवली होती. आता त्याचे स्कॅन करण्यात आले असून त्याचे रिपोर्ट्सही समोर आले आहेत.

न्यूझीलंड क्रिकेटने माहिती दिल्यानुसार त्याच्या स्कॅनमध्ये स्पष्ट झाले आहे की त्याच्या हॅमस्ट्रिंगमध्ये ताण आला आहे. त्याच्याऐवजी संघात विल यंगला संधी देण्यात आली आहे. तसेच टीम साऊदी नेतृत्वाची जबाबदारी सांभाळेल.

विलियम्सन हॅमिल्टनला पाकिस्तानविरुद्ध दुसरा टी20 सामन्यात फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला.

या सामन्यात 10 व्या षटकात धाव पूर्ण करत असताना त्याच्या उजव्या हॅमस्ट्रिंगमध्ये ताण आला होता. त्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतावे लागले होते. त्यावेळी तो 15 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह 26 धावांवर खेळत होता.

दरम्यान, नंतर तो या सामन्यात सहभागी होऊ शकला नाही. त्याच्याऐवजी उर्वरित सामन्यात टीम साऊदीने प्रभारी कर्णधारपद सांभाळले होते.

न्यूझीलंडला पाकिस्तानविरुद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना 17 जानेवारीला खेळायचा आहे, तसेच नंतर 19 आणि 21 जानेवारी रोजी अनुक्रमे चौथा आणि पाचवा टी20 सामना होईल.

दरम्यान, अद्यापही विलियम्सन गेल्यावर्षी झालेल्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियनंतर पूर्ण तंदुरुस्ती मिळवत आहे. त्यातच त्याला होणाऱ्या सातत्याच्या दुखापतींनी न्यूझीलंडची चिंता वाढवली आहे. गेल्या वर्षभरात विलियम्सन अनेक सामन्यांना दुखापतीमुळे मुकला आहे.

कसोटी मालिकेत करणार पुनरागमन?

न्यूझीलंडला 4 फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका कसोटी चॅम्पियनशीप 2023-25 स्पर्धेचा भाग आहे. दरम्यान, विलियम्सन या मालिकेपूर्वी पूर्ण तंदुरुस्त होईल, अशी आशा न्यूझीलंड क्रिकेटला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT