Netherlands Team  Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: नेदरलँड्सने बांगलादेशला हरवलं, वर्ल्डकमध्ये केली दुसऱ्या विजयाची नोंद!

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 28 वा सामना शनिवारी ईडन गार्डन्सवर नेदरलँड आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला.

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 28 वा सामना शनिवारी ईडन गार्डन्सवर नेदरलँड्स आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. या सामन्यात नेदरलँड्सने बांगलादेशचा 87 धावांनी पराभव केला. या विजयासह नेदरलँड्सने स्पर्धेतील दुसरा विजय संपादन केला.

त्याचवेळी, बांगलादेश संघाला पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. यासह शाकिब अल हसन अँड कंपनीचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्नही जवळपास भंग पावले. आता काही करिष्माच त्यांना उपांत्य फेरीचे तिकीट मिळवून देऊ शकतो.

नेदरलँड्सचा संघ 229 धावांवर गडगडला

दरम्यान, या सामन्यात नेदरलँड्सचा (Netherlands) कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडचा संघ 50 षटकांत 229 धावांत गारद झाला.

यासह बांगलादेश संघाला विजयासाठी 230 धावांचे लक्ष्य मिळाले होते. नेदरलँड्सकडून कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने सर्वाधिक 68 धावा केल्या. याशिवाय वेस्ली बारेसीने 41 धावा केल्या, तर सायब्रँड एंजेलब्रेक्टने 35 धावांची खेळी खेळली.

बांगलादेशकडून शरीफुल इस्लाम, तस्किन अहमद, मुस्तफिझूर रहमान आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर कर्णधार शकिब अल हसनने 1 विकेट्स घेतली.

बांगलादेशचे खराब प्रदर्शन

दुसरीकडे, 230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची (Bangladesh) सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर लिटन दास अवघ्या 3 धावा करुन बाद झाला. तनजीद हसन 16 चेंडूत 15 धावा करुन बाद झाला. मेहदी हसन मिराजने काही धावा जोडण्याचा प्रयत्न केला.

मात्र तोही 35 धावा करुन बाद झाला. नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी विरोधी संघासाठी एकही संधी सोडली नाही. कर्णधार शकिब अल हसनला वैयक्तिक 5 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मुशफिकर रहीम 1 धावा करुन बाद झाला.

मेहदी हसन 17 धावा करुन बाद झाला. त्याने 38 चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये एक चौकार मारला. शेवटी मुस्तफिजुर रहमानने 35 चेंडूत 20 धावा केल्या. तस्किन अहमदने 11 धावा केल्या. अशाप्रकारे 42.2 षटकात 142 धावा करुन संपूर्ण संघ ऑलआऊट झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bank Scam: गोवा राज्य बँक घोटाळा! ठोस पुराव्यांअभावी वेळीपांसह सर्व संशयित दोषमुक्त

Arpora Sarpanch: बर्च क्लब अग्नितांडवप्रकरणी नवीन अपडेट! भूमिगत माजी सरपंच न्यायालयासमोर हजर; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍न

Chimbel Unity Mall: युनिटी मॉलचे काय होणार? संपूर्ण राज्याचे लक्ष चिंबलकडे; लढ्यासाठी ग्रामस्थ सज्ज

Chimbel Unity Mall: युनिटी मॉलविरोधात रणशिंग! ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांवर दिशाभूल केल्याचा खळबळजनक आरोप; राजकीय बहिष्काराचा एल्गार

T20 World Cup 2026: आयसीसीने शिकवला धडा! भारताशी पंगा घेणं बांगलादेशला पडलं महाग; वर्ल्ड कपमधून पत्ता कट

SCROLL FOR NEXT