नीरजने का व्यक्त केली शांत झोपेची अपेक्षा Dainik Gomantak
क्रीडा

नीरजने का व्यक्त केली शांत झोपेची अपेक्षा

भालाफेकीच्या स्पर्धेसाठी क्रीडानगरीतून स्टेडियमपर्यंतचा प्रवास नीरज कधीही विसरणार नाही.

दैनिक गोमन्तक

टोकियो: ऑलिंपिक (Olympics) क्रीडानगरीत दाखल झाल्यापासून नीरज चोप्राला (Neeraj Chopra) रात्रीची शांत झोप हवी होती. युरोप आणि जपानच्या (Japan) वेळेतील फरक, पात्रतेची भल्या पहाटेची वेळ, त्यातच चाचणी यामुळे नीरजला टोकियोत शांत झोपच लागली नव्हती. ऑलिंपिक सुवर्णपदक (Olympic gold medal) जिंकल्यानंतर आता शांत झोप लागेल, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली होती.

मी स्वीडनहून थेट टोकियोत आलो. त्यामुळे बदलेल्या वेळेशी जुळवून घेण्यात वेळ जाणार होता. खरे तर टोकियोत आलो, त्या वेळी रात्री उशिरा झोपून उशिरा उठण्याचे ठरविले होते; पण काही दिवसांपासून उत्तेजक चाचणीसाठी पहाटे उठवले जात होते, असे नीरजने सांगितले.

भालाफेकीच्या स्पर्धेसाठी क्रीडानगरीतून स्टेडियमपर्यंतचा प्रवास नीरज कधीही विसरणार नाही. या स्पर्धेसाठी स्पर्धकांना घेऊन जाणारी बस स्टेडियमला निघाली आणि काही वेळातच पाकिस्तानचा अर्शद नदीम नीरजकडे आला. त्याच्या मोबाईलमध्ये असलेले दोघांचे एकत्रित छायाचित्र दाखवले. त्याने आपल्या दोघातील स्पर्धेची पाकिस्तानात अब्दुल खलीक आणि मिल्खा सिंग यांच्यातील स्पर्धशी तुलना करतात, असे सांगितले. ही आठवण टोकियोतील निवडक पत्रकारांना सांगताना नीरज भावूक झाला. मिल्खा सिंग यांचे निधन झाले, त्या वेळी मी खूप निराश झालो. ऑलिंपिक पदकासह त्यांची भेट घेण्याची इच्छा होती; पण ती पूर्ण झाली नाही, असे तो म्‍हणाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT