Neeraj Chopra Dainik Gomantak
क्रीडा

Neeraj Chopra: 88.77 मीटर भालाफेक! नीरजची वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक

World Athletics Championships 2023: हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 चे आयोजन करण्यात आले आहे.

Manish Jadhav

World Athletics Championships 2023: हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने या चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली.

पॅरिस ऑलिम्पिकसाठीही तो पात्र ठरला आहे. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर भाला फेकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. आजपर्यंत भारताला या चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळालेले नाही.

नीरज चोप्राची नजर 'सुवर्णपदकावर'

दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) सुवर्णपदक पटकावणारा भालाफेकपटू नीरज चोप्राची नजर आता जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या विजेतेपदावर आहे.

गतवर्षी नीरज चोप्राला या स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. अंतिम सामना 27 ऑगस्ट रोजी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 11.45 वाजता सुरु होईल.

पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट

नीरजने पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी देखील एकाच थ्रोने पात्रता मिळवली. खरेतर, पॅरिस ऑलिम्पिकचे पात्रता गुण 85.50 मीटर आहे आणि नीरजचा थ्रो या गुणाच्या पुढे गेला आहे. ऑलिम्पिक क्वालिफाइंग विंडो 1 जुलैपासून सुरु झाली.

88.77 मीटर ही नीरजची कारकिर्दीतील चौथी सर्वोत्तम कामगिरी होती. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम 89.94 मीटर आहे, जी त्याने गेल्या वर्षी जूनमध्ये डायमंड लीगमध्ये थ्रो केला होता.

टोकियो ऑलिम्पिकमधील 'चॅम्पियन'

दुसरीकडे, नीरज चोप्राने (Neeraj Chopra) 2021मध्ये खेळल्या गेलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास रचला होता. त्यानंतर त्याने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. एवढेच नाही तर अ‍ॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.

नीरजने 87.58 मीटर अंतरावर भाला फेकला होता. यानंतर झुरिच येथील प्रतिष्ठेच्या डायमंड लीगमध्येही त्याने देशासाठी सुवर्णपदक मिळवले होते. 2024 मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत हे सातत्य राखण्याचे त्याचे ध्येय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT