Navelim Rosary College Girls Football Team Dainik Gomantak
क्रीडा

Girls Football Tournament: रोझरी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुली राष्ट्रीय स्पर्धेस पात्र

किशोर पेटकर

Navelim Rosary College Girls Football Team: नावेलीच्या रोझरी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुलींनी सलग तिसऱ्या वर्षी राष्ट्रीय पातळीवरील मुलींच्या सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळविला.

राज्यस्तरीय अंतिम सामना जिंकताना त्यांनी उत्तर जिल्हा विजेत्या हरमलच्या अवर लेडी ऑफ माऊंट कार्मेल हायस्कूलचा ७-० असा धुव्वा उडविला.

रोझरी उच्च माध्यमिक विद्यालयाने दक्षिण जिल्हा पातळीवर वर्चस्व मिळविले होते. क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेचा राज्यस्तरीय अंतिम सामना शनिवारी सांताक्रूझ येथील मैदानावर झाला.

रोझरी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या एकतर्फी विजयात फातिमा ब्रागांझा हिने चार गोल केले. रिया पत्रे हिने दोन, तर शेरी फर्नांडिस हिने एक गोल नोंदविला. या महिन्यात दिल्ली येथे मुलींची राष्ट्रीय सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धा होणार आहे, त्यावेळी रोझरी हायस्कूल गोव्याचे प्रतिनिधित्व करेल.

क्रीडा खात्याचे साहाय्यक शारीरिक शिक्षण अधिकारी पांडुरंग नाईक, विभागीय क्रीडा आयोजक संजय शिरोडकर, राज्य क्रीडा आयोजक अनंत सावळ यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT