Namibia Cricket ICC
क्रीडा

T20 World Cup 2024: नामिबियाची वर्ल्डकपमध्ये थाटात एन्ट्री! आता रथी महारथींना भिडणार

Namibia Cricket: नामिबियाने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेची पात्रता मिळवली आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत.

Pranali Kodre

Namibia confirm Spot at ICC Men's T20 World Cup 2024:

पुढीलवर्षी म्हणजेच 2024 साली कॅरेबियन बेटांवर आणि अमेरिकेत टी20 वर्ल्डकप स्पर्धा खेळवली जाणार आहे. 2024 साली होणाऱ्या या टी20 वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच तब्बल 20 संघ सहभागी होणार आहेत. हा नववा टी20 वर्ल्डकप असणार आहे.

या टी20 वर्ल्डकपसाठी नामिबियाने पात्रता मिळवली आहे. त्यांनी आफ्रिका क्वालिफायरमधून या स्पर्धेची पात्रता मिळवली आहे. त्यांनी मंगळवारी (28 नोव्हेंबर) टांझानियाला 58 धावांनी पराभूत करत टी20 वर्ल्डकप 2024 मधील जागा पक्की केली.

नामिबियाने सलग पाच सामने जिंकले आहेत. त्यांनी आफ्रिका क्वालिफायरमध्ये गुणतालिकेत 10 गुणांसह पहिल्या दोन क्रमांकामधील स्थान पक्के केले आहे. गुणतालिकेतील पहिले दोन संघ टी20 वर्ल्डकप 2024 साठी पात्र ठरणार होते.

त्यानुसार आता नामिबियाने आपले स्थान पक्के केले असून आता दुसऱ्या स्थानासाठी युगांडा, केनिया, झिम्बाब्वे आणि नायजेरिया यांच्यात शर्यत आहे. युगांडा आणि केनिया यांना आपापल्या सामन्यात विजय मिळवून ते उर्वरित स्थान मिळवण्याची थेट संधी आहे. मात्र, झिम्बाब्वे आणि नायजेरिया यांना अन्य संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे.

दरम्यान, नामेबियाबद्दल सांगायचे झाल्यास, ते सलग तिसऱ्यांदा टी20 वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसणार आहेत. 2021 साली झालेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये सुपर 12 फेरीतही पोहचले होते, तर 2022 साली झालेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये मात्र त्यांना सुपर 12 मध्ये पोहचता आले नव्हते.

मंगळवारी झालेल्या सामन्यात नामेबियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 157 धावा केल्या होत्या. त्यानंतर टांझानियाला 20 षटकात 6 बाद 99 धावाच करता आल्या.

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी 19 संघ निश्चित

टी20 वर्ल्डतप 2024 स्पर्धेत खेळणाऱ्या 20 संघांपैकी आता 19 संघ निश्चित झाले आहेत. आता केवळ एक जागा रिकामी आहे. ही जागा युगांडा, केनिया, झिम्बाब्वे आणि नायजेरिया यांच्यातील एकाला मिळू शकते.

दरम्यान, टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी टी20 वर्ल्डकप 2022 मधील पहिले 8 संघ म्हणजेच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्याबरोबरच टी20 क्रमवारीत पहिल्या 10 संघांमध्ये असेलल्या अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांना थेट पात्रता मिळाली आहे.

त्याचबरोबर वेस्ट इंडिज आणि अमेरिका हे यजमान असल्याने ते देखील थेट पात्र ठरले आहेत. याशिवाय पापुआ न्यू गिनी (PNG) संघाने इस्ट एशिया पॅसिफिक क्वालिफिकेशनमधून पात्रता मिळवली आहे, तर आयर्लंड आणि स्कॉटलंड युरोप रिजन क्वालिफायरमधून पात्र ठरले आहेत.

आशिया क्वालिफिकेशनमधून नेपाळ आणि ओमानने पात्रता मिळवली आहे. त्याचबरोबर अमेरिका क्वालिफिकेशनमधून कॅनडाने पात्रता मिळवली आहे. तसेच आफ्रिका क्वालिफायरमधून नामिबियाने पात्रता मिळवली असून यातूनच आणखी एक संध निश्चित होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT