Cricket player suicide note news Dainik Gomantak
क्रीडा

Cricketer Suicide: 'माझी संघात निवड झाली नाही...'; सुसाइड नोट लिहून क्रिकेटपटूची आत्महत्या, क्रीडाविश्वात हळहळ

Nagpur woman cricketer death: नागपुरातील एका 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूच्या मृत्यूच्या घटनेने क्रीडाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

Sameer Amunekar

नागपुरातील एका 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूच्या मृत्यूच्या घटनेने क्रीडाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. मोठ्या स्तरावर क्रिकेटमध्ये नाव कमावण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या तरुण खेळाडूचा घरात मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (VCA) निवड प्रक्रियेत स्थान न मिळाल्यामुळे ती मानसिक तणावात असल्याचा संशय व्यक्त केला जात असला, तरी पोलिसांनी अद्याप कोणतेही अंतिम कारण निश्चित केलेले नाही.

क्रिकेटमध्ये मोठी झेप घेण्याचे स्वप्न

अदिती मोरेश्वर चौकांडे ही मूळची अकोला जिल्ह्यातील रहिवासी होती. गेल्या दोन वर्षांपासून ती आईसोबत नागपुरात राहत होती आणि क्रिकेटमध्ये करिअर घडवण्यासाठी नियमित सराव करत होती. एका नामांकित क्रिकेट अकादमीत ती प्रशिक्षण घेत होती. तिचे मोठ्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आणि देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न होते. तिचा भाऊदेखील क्रिकेटशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक तपासात काय समोर आले?

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, अलीकडे झालेल्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या निवड प्रक्रियेत तिची निवड झाली नव्हती. त्यानंतर ती निराश आणि मानसिक तणावाखाली असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. घटनास्थळी एक चिठ्ठीही आढळल्याचे सांगितले जात असून, त्याचा तपास सुरू आहे.

मात्र, केवळ या माहितीच्या आधारे मृत्यूचे कारण निश्चित करण्यात आलेले नसून, सर्व शक्य बाबींची चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांकडून चौकशी

घटनेची माहिती मिळताच बजाजनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदन अहवाल, जप्त केलेले पुरावे आणि कुटुंबीयांच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होईल. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी अधिकृत तपास अहवालाची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे.

क्रीडाविश्वात हळहळ

या घटनेनंतर स्थानिक क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे. अनेकांनी या युवा क्रिकेटपटूच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून, युवा खेळाडूंना केवळ स्पर्धात्मक तयारीच नव्हे तर मानसिक आरोग्याचेही योग्य मार्गदर्शन आणि आधार मिळणे तितकेच महत्त्वाचे असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT