Mumbai Indians Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2026 Playoff Scenario: मुबंई इंडियन्ससाठी 'करो या मरो'ची स्थिती! एका पराभवानं 'प्लेऑफ'चं स्वप्न भंगणार; जाणून घ्या समीकरणं

Mumbai Indians IPL 2026 Playoff Chances: आयपीएल 2026 चा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी एखाद्या दुःस्वप्नासारखा ठरत आहे. विजयाच्या मार्गावर परतण्याचे सर्व प्रयत्न सध्या तरी फेल ठरताना दिसत आहेत.

Manish Jadhav

IPL 2026 Playoff Scenario: आयपीएल 2026 चा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी एखाद्या दुःस्वप्नासारखा ठरत आहे. विजयाच्या मार्गावर परतण्याचे सर्व प्रयत्न सध्या तरी फेल ठरताना दिसत आहेत. बुधवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना 240 हून अधिक धावांचा डोंगर उभा करुनही मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर आता चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचे या हंगामातील आव्हान संपले आहे की अजूनही काही संधी बाकी आहे? तर याचे उत्तर तांत्रिकदृष्ट्या 'नाही' असे असले तरी पुढचा मार्ग अत्यंत खडतर आहे.

सध्याच्या गुणतालिकेचा विचार केला तर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 8 सामने खेळले असून त्यापैकी केवळ 2 सामन्यांत त्यांना विजय मिळवता आला आहे, तर 6 सामन्यांत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. केवळ 4 गुणांसह मुंबईचा संघ 9व्या क्रमांकावर संघर्ष करत आहे. आता मुंबईचे लीग स्टेजमध्ये एकूण 6 सामने शिल्लक आहेत. जर मुंबईने हे सहाच्या सहा सामने जिंकले, तर त्यांचे एकूण 16 गुण होतील. 16 गुण प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी सुरक्षित मानले जातात. मात्र, पहिल्या 8 सामन्यात केवळ 2 विजय मिळवणाऱ्या संघाकडून सलग 6 सामने जिंकण्याची अपेक्षा करणे हे मोठे आव्हान आहे.

मुंबईसाठी खरी अडचण नेट रनरेटची आहे. सध्या मुंबईचा नेट रनरेट -0.784 असा असून तो खूपच खराब आहे. जर मुंबई उरलेल्या 6 पैकी एखादा सामना हरली, तर त्यांना जास्तीत जास्त 14 गुणांपर्यंतच मजल मारता येईल. 14 गुणांवरही काही संघ पूर्वी प्लेऑफमध्ये गेले आहेत, पण अशा वेळी नेट रनरेटचा पेच निर्माण होतो. त्यामुळे मुंबईला केवळ विजय मिळवून चालणार नाही, तर ते विजय मोठ्या फरकाने मिळवावे लागतील. जेणेकरुन दोन संघांचे गुण समान झाल्यास मुंबई सरस ठरेल.

मुंबई इंडियन्सला स्वतःच्या कामगिरीसोबतच इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. मुंबईला अशी प्रार्थना करावी लागेल की, पंजाब किंग्स, आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स यांसारख्या वरच्या क्रमांकावरील संघांनी त्यांचे सामने जिंकत राहावे, जेणेकरुन चौथ्या क्रमांकावरील संघाला जास्त गुण मिळणार नाहीत. तसेच, गुणतालिकेत खाली असलेले संघ सातत्याने हरत राहिले तरच मुंबईसाठी आशा निर्माण होऊ शकते. यापूर्वी 2014 आणि 2015 मध्ये मुंबईने दुसऱ्या सत्रात अशीच ऐतिहासिक पुनरागमन करण्याची किमया साधली होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता इथून एकही पराभव मुंबईचे स्पर्धेतील आव्हान कायमचे संपुष्टात आणू शकतो. त्यामुळे आता प्रत्येक सामना मुंबईसाठी 'करा किंवा मरो' असाच असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

Rohit Sharma TV Show: क्रिकेटनंतर मनोरंजन विश्वात 'हिटमॅन'ची नवी इनिंग; रोहित शर्माचा स्वतःचा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Shukra Gochar 2026: कौटुंबिक सुख, रोमान्स अन् अफाट पैसा...! शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन; 5 राशींना होणार तगडा धनलाभ

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT