Mumbai Indians Dainik Gomantak
क्रीडा

गुजरातचा पराभव निश्चित? Mumbai Indians ने पोलार्डच्या बर्थडेला विरोधकांचे वाजलेत 'बारा'; अजब योगायोग पाहाच...

आयपीएलमध्ये 12 मे रोजी झालेल्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सबाबत अजब योगायोग झाल्याचे आजपर्यंतच्या आकडेवारीतून दिसून आले आहे.

Pranali Kodre

Mumbai Indians have so far not faced defeat on 12th May: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शुक्रवारी (12 मे) मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात 57 वा सामना पार पडणार आहे. वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे मुंबईचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्डचा 12 मे रोजी वाढदिवसही असतो. त्यामुळे त्याच्या वाढदिवसाला मुंबई त्याला विजयाचे गिफ्ट देण्यास उत्सुक असतील.

विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 12 मे रोजी म्हणजेच पोलार्डच्या वाढदिवसाच्या दिवशी खेळलेल्या कोणत्याच सामन्यात पराभवाचा सामना केलेला नाही. त्याचमुळे 12 मे हा दिवस मुंबईसाठी लकी मानला जातो. विशेष असे की पोलार्डने मुंबईकडून पदार्पण करण्याच्या आधीपासून ही परंपरा सुरू आहे.

मुंबई 12 मे रोजी अपराजित

मुंबईने यापूर्वी 12 मे रोजी आयपीएलमध्ये एकूण ५ सामने खेळले आहेत. या पाचही सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. आत्तापर्यंत मुंबईने 2009, 2012, 2014, 2019 आणि 2022 या वर्षीच्या आयपीएल हंगामांमध्ये 12 मे रोजी सामने खेळले आहेत.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की 2019 साली 12 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना पार पडला होता. अत्यंत चूरशीचा झालेल्या या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नई सुपर किंग्स संघाचा 1 धावेने पराभव केला होता आणि विक्रमी चौथे आयपीएल विजेतेपद पटकावले होते.

याशिवाय मुंबईने 2009 साली सर्वात आधी 12 मे रोजी सामना खेळला होता. हा सामना पंजाब किंग्स (त्यावेळचे किंग्स इलेव्हन पंजाब) विरुद्ध हा सामना खेळला होता, ज्यात मुंबई इंडियन्सने 8 विकेट्सने विजय मिळवलेला.

त्यानंतर 2012 साली कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 12 मे रोजी सामना खेळताना मुंबईने 27 धावांनी विजय मिळवलेला. त्याचबरोबर 2014 साली सनरायझर्स हैदाराबादविरुद्ध मुंबईने 12 मे रोजी 7 विकेट्सने विजय मिळवलेला. गेल्यावर्षी मुंबईने 12 मे रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सामना खेळलेला, ज्यात त्यांनी 5 विकेट्सने विजय मिळवलेला.

गुजरातविरुद्ध विजय महत्त्वाचा

आता हीच परंपरा मुंबई यावर्षीही कायम ठेवणार का हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, मुंबईसाठी शुक्रवारी गुजरातविरुद्ध होणारा सामना प्लेऑफच्या शर्यतीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे.

या सामन्यात गुजरातने विजय मिळवल्यास गुजरात प्लेऑफमधील स्थान पक्के करतील, मात्र मुंबईसाठी प्लेऑफची शर्यत कठीण होईल. पण जर मुंबईने विजय मिळवला, तर त्यांच्यासाठी प्लेऑफचा मार्ग सुकर होणार आहे. मुंबईने आयपीएल 2023 मध्ये आत्तापर्यंत 11 सामने खेळले असून त्यांनी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर 5 सामन्यांमध्ये पराभव स्विकारला आहे. त्यामुळे सध्या मुंबई 12 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

आयपीएलमध्ये 12 मे रोजी मुंबई इंडियन्सचे सामने

2009 - विरुद्ध पंजाब किंग्स (8 विकेट्सने विजय)

2012 - विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (27 धावांनी विजय)

2014 - विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (7 विकेट्सने विजय)

2019 - विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (अंतिम सामना, 1 धावेने विजय)

2022 - विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (5 विकेट्सने विजय)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Court Verdict: जिल्हा न्यायालयाचा निर्णय हायकोर्टाने बदलला; खून प्रकरणात 10 वर्षे शिक्षा झालेल्या आरोपीची सुटका

France Violence: नेपाळनंतर फ्रान्समध्ये 'अराजक'! नवा पंतप्रधान निवडताच उसळला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड सुरु; 200 आंदोलकांना अटक VIDEO

"माझे आजोबा पंतप्रधान...", प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीची Post Viral; नेपाळच्या राजकारणाशी नेमका संबंध काय?

Goa Assembly Speaker Election: सभापतीपदाच्या खूर्चीवर कोण बसणार? विरोधी पक्षाकडून एल्टन डिकॉस्ता मैदानात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात

Goa Cabinet: दिवाडीतील सप्तकोटेश्वर मंदिराचा चेहरामोहरा बदलणार; 'कोटी तीर्थ कॉरिडॉर'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

SCROLL FOR NEXT