Harmanpreet Kaur  Dainik Gomantak
क्रीडा

WPl 2023 च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा दणदणीत विजय, गुजरातला...

WPl 2023: मुंबई इंडियन्स (MI) ने वुमेन्स प्रीमियर लीग (WPL) 2023 मध्ये विजयी सुरुवात केली.

Manish Jadhav

WPl 2023: मुंबई इंडियन्स (MI) ने वुमेन्स प्रीमियर लीग (WPL) 2023 मध्ये विजयी सुरुवात केली. शनिवारी झालेल्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुंबईने गुजरात जायंट्सचा (जीजीटी) 143 धावांनी पराभव केला. कर्णधार हरमनप्रीत कौर (65), हेली मॅथ्यूज (47) आणि अमेलिया केर (नाबाद 45) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने 208 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.

प्रत्युत्तरात, गुजरात (Gujarat) संघाने 15.1 षटकांत 9 गडी गमावून 64 धावा केल्या. कर्णधार बेथ मुनी (0) पहिल्याच षटकात दुखापतग्रस्त झाली आणि पुन्हा फलंदाजीला आली नाही. गुजरातकडून दयालन हेमलताने (29) सर्वाधिक धावा केल्या. मुंबईकडून सायका इसाकने 4 बळी घेतले. नताली सायव्हर-अमेलियाने प्रत्येकी दोन आणि अमेलियाने एक विकेट घेतली.

दरम्यान, नाणेफेक गमावून फलंदाजीला उतरलेल्या मुंबई संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर यस्तिका भाटिया (8 चेंडू 1) तिसऱ्या षटकात 15 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतली.

यानंतर सलामीवीर हेली मॅथ्यूजने नताली स्कायव्हर (28 चेंडूत 23) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. नवव्या षटकात स्कायव्हरने विकेट गमावली.

त्याचवेळी, मॅथ्यूज 10व्या षटकात बाद झाली. तिने 31 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह 47 धावा केल्या.

दुसरीकडे, 77 धावांवर मुंबईचे तीन विकेट पडल्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने आघाडी घेतली. तिने अमेलिया केरसोबत चौथ्या विकेटसाठी 89 धावांची शानदार भागीदारी केली. हरमनप्रीतने 23 चेंडूत तिचे अर्धशतक पूर्ण केले. या स्पर्धेत अर्धशतक ठोकणारी ती पहिली खेळाडू ठरली.

त्याचबरोबर, हरनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) तुफानी फलंदाजी केल्यानंतर 17व्या षटकात विकेट गमावली. 30 चेंडूत 14 चौकारांसह 65 धावा केल्या. पूजा वस्त्राकरने 8 चेंडूत 15 धावांचे योगदान दिले. ती 20 व्या षटकात बाद झाली. अमेलियाने 24 चेंडूत नाबाद 45 धावा केल्या. तिने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार लगावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 40 आमदारांत ‘मगो’ असेल की नाही, हे जनताच ठरवेल! ‘मगो’ समर्थकांचा हल्लाबोल; सरदेसाईंच्या विधानाचा निषेध

Margao Master Plan: मडगावचा ‘मास्टर प्लॅन’ काहींचे ‘निवृत्ती पॅकेज’! सरदेसाईंचा आरोप; लाेकांचा आराखडा बनवण्‍याचे आश्‍वासन

Ahmedabad Plane Crash Report: "इंधन पुरवठा बंद केलास का?", अहमदाबाद दुर्घटनेबाबत मोठा खुलासा; प्राथमिक अहवालात समोर आला दोन्ही पायलटचा 'शेवटचा' संवाद

LIC Fraud Goa: गोव्यात ‘एलआयसी’मध्ये 43 लाखांचा घोटाळा! संस्थेचे 30 लाखांचे नुकसान; अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Goa Heritage: गोव्यात पुरातत्व क्षेत्रात परवानगीशिवाय काम केल्यास 10 लाखांचा दंड! धोरण अधिसूचित; होणार ऑनलाईन ट्रॅकिंग

SCROLL FOR NEXT