Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: दिल्लीची झोळी रिकामीच! मुंबई इंडियन्सचा सहा गडी राखून विजय

IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्सच्या (MI) विजयाचे खाते उघडले आहे.

Manish Jadhav

IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्सच्या (MI) विजयाचे खाते उघडले आहे. सलग दोन पराभवानंतर मंगळवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्सवर (DC) 6 विकेट्सने विजय मिळवला.

मुंबईला शेवटच्या चेंडूवर विजय मिळाला. डीसीचा हा सलग चौथा पराभव आहे. अक्षर पटेल (54) आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर (51) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्लीने 173 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात मुंबईने निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून विजयाचा झेंडा फडकावला.

मुंबई इंडियन्स जिंकली

मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी शानदार सुरुवात केली. रोहितने 45 चेंडूत 65 धावा केल्या, ज्यात 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. समन्वयाअभावी ईशान किशन धावबाद झाला. त्याने 31 धावांची शानदार खेळी खेळली.

याशिवाय, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या तिलक वर्माने 41 धावा केल्या. मात्र, स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा खातेही उघडू शकला नाही आणि धावा न करताच बाद झाला.

दुसरीकडे, कॅमेरुन ग्रीन आणि टीम डेव्हिडने शेवटच्या षटकात मुंबईला विजय मिळवून दिला. कर्णधार रोहित शर्मा आणि पियुष चावला यांनी मुंबई इंडियन्ससाठी चमकदार कामगिरी केली.

तसेच, दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) गोलंदाज प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. दिल्ली कॅपिटल्सकडून मुकेश कुमारने 2 षटकात 30 धावा देत 2 बळी घेतले. तर मुस्तफिजुर रहमानने 1 बळी घेतला.

दिल्ली कॅपिटल्सने 173 धावांचे लक्ष्य दिले होते

कर्णधार डेव्हिड वॉर्नरशिवाय (David Warner) दिल्ली कॅपिटल्ससाठी कोणताही खेळाडू म्हणावी तशी कामगिरी करु शकला नाही. सलामीवीर पृथ्वी शॉ अवघ्या 15 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला.

यानंतर मनीष पांडेने 26 धावा केल्या. त्यानंतर पदार्पण करणारा यश धुलही केवळ 2 धावा करुन बाद झाला. ललित यादवने 2 धावांचे योगदान दिले.

कर्णधार वॉर्नरने 47 चेंडूंत 6 चौकारांसह 51 धावा केल्या. शेवटी अक्षर पटेलने तुफानी फलंदाजी केली. त्याने अवघ्या 25 चेंडूत 54 धावा केल्या. अभिषेक पोरेलने 1 धाव, कुलदीप यादव शून्यावर आऊट झाला. अक्षर पटेलमुळेच दिल्ली कॅपिटल्सला 172 धावांपर्यंत मजल मारता आली.

या खेळाडूंनी मुंबईसाठी शानदार गोलंदाजी केली

मुंबई इंडियन्ससाठी पियुष चावलाने शानदार गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 22 धावा देत 3 बळी घेतले. याशिवाय जेसन बेहरेनडॉर्फने 3 षटकांत 33 धावा देत 3 बळी घेतले. रिले मेड्रिथने 2 आणि हृतिक शोकीनने 1 बळी घेतला.

मुंबई इंडियन्सचा वरचष्मा राहीला आहे

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत 33 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने 15 सामने जिंकले आहेत.

त्याचबरोबर मुंबई संघाने 18 सामन्यात विजय मिळवला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्याचवेळी, दिल्ली कॅपिटल्सला एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT