MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: MS Dhoni ने केला सर्वात मोठा रेकॉर्ड, 2 अस्मानी षटकार ठोकत ठरला...

IPL 2023: चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स (CSK vs LSG) यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात धोनीने 8 धावा करत एक मोठा विक्रम केला आहे.

Manish Jadhav

IPL 2023: चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स (CSK vs LSG) यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात धोनीने 8 धावा करत एक मोठा विक्रम केला आहे. धोनीने 5000 धावा पूर्ण केल्या आहेत. धोनीने 3 चेंडूत 12 धावा केल्या. ज्यामध्ये त्याने 2 शानदार षटकार ठोकले.

दरम्यान, आयपीएलच्या इतिहासात 5000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो सातवा फलंदाज ठरला आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकात 217 धावा केल्या. चेन्नईविरुद्धच्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जयदेव उनाडकटच्या जागी यश ठाकूरचा लखनऊ संघात समावेश करण्यात आला आहे, तर चेन्नई संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

1. विराट कोहली – 6706

2. शिखर धवन – 6284

3. डेविड वॉर्नर – 5937

4. रोहित शर्मा – 5880

5.सुरेश रैना – 5528

6.एबी डिविलियर्स- 5162

7. एम एस धोनी- 5004

दुसरीकडे, ऋतुराज गायकवाडने चेन्नईला दमदार सुरुवात करुन दिली. कॉनवेच्या मदतीने ऋतुराजने पॉवरप्लेमध्ये 79 धावा केल्या. चेपॉकमध्ये पहिल्यांदाच पॉवरप्लेमध्ये चेन्नईने एवढा स्कोअर केला आहे. यानंतर दोन्ही फलंदाजांनी मिळून चेन्नईची धावसंख्या 8 षटकांत 100 च्या पुढे नेली. कॉनवे आणि ऋतुराजने तिसऱ्यांदा शतकी भागीदारी केली. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच चेन्नईच्या सलामीवीरांनी तीन शतकी भागीदारी केली आहे.

तसेच, ऋतुराज गायकवाड या आयपीएल हंगामात 100 धावांचा टप्पा पार करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. ऋतुराजने 2 सामन्यात 149 धावा केल्या असून त्याची सरासरी 74.50 आहे. या खेळाडूचा स्ट्राईक रेटही 183.95 आहे. ऋतुराजने 2 सामन्यात 13 षटकार मारले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Homes: दिलासा! गोव्यात बेघर लोकांना मिळणार हक्काचे घर; CM सावंतांची घोषणा

Goa Government Jobs: गोव्यातील सरकारी खात्‍यांत 2618 पदे रिक्त; वीज, वन, सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये सर्वाधिक पदे

Rashi Bhavishya 29 July 2025: भावनिक अस्थिरता जाणवेल, आर्थिक बाबतीत नवीन संधी येतील; नव्या जबाबदाऱ्यांचं स्वागत करा

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

SCROLL FOR NEXT