MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: "आता बस करा माही भाई!" धोनीला नीट चालताना येईना, IPLपूर्वी फिटनेसवर प्रश्नचिन्ह, व्हिडिओ पाहून फॅन्सचं टेन्शन वाढलं

IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ चा थरार सुरू होण्यापूर्वीच क्रिकेट जगतात एका मोठ्या चर्चेने जोर धरला आहे.

Sameer Amunekar

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ चा थरार सुरू होण्यापूर्वीच क्रिकेट जगतात एका मोठ्या चर्चेने जोर धरला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) आधारस्तंभ आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर 'थला'चे चाहते चिंतेत पडले असून, धोनी या हंगामात पूर्णपणे फिट आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सीएसके संघ सध्या सरावात व्यस्त असला तरी धोनीच्या हालचालींनी चाहत्यांची धाकधूक वाढवली आहे.

व्हिडिओ व्हायरल

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनीला चालताना काहीसा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. त्याच्या चालण्यातील लचक पाहून अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी आणि चाहत्यांनी असा अंदाज वर्तवला आहे की, धोनीच्या गुडघ्याचा जुना त्रास अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. गेल्या काही हंगामांपासून धोनी गुडघ्याच्या दुखापतीशी झुंज देत आहे.

यासाठी त्याने शस्त्रक्रियाही करून घेतली होती, मात्र वाढत्या वयाचा परिणाम आता त्याच्या फिटनेसवर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. येत्या जुलैमध्ये धोनी ४५ वर्षांचा होणार आहे, अशा परिस्थितीत आयपीएलसारख्या स्पर्धात्मक पातळीवर खेळणे हे त्याच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

धोनी सर्व सामने खेळणार नाही

धोनीच्या फिटनेसच्या समस्या लक्षात घेता, चेन्नई सुपर किंग्सचे व्यवस्थापन या हंगामात मोठी जोखीम पत्करण्याच्या तयारीत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनी या सत्रात सर्व सामने खेळण्याची शक्यता कमी आहे. तो केवळ महत्त्वाच्या किंवा निवडक सामन्यांमध्येच मैदानात उतरू शकतो. धोनी खेळणार नसलेल्या सामन्यांमध्ये संजू सॅमसन यष्टीरक्षकाची जबाबदारी सांभाळताना दिसू शकतो, तर कार्तिक शर्माला प्लेइंग-११ मध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

मार्गदर्शक म्हणून धोनीची भूमिका ठरणार कळीची

जरी धोनी मैदानात प्रत्यक्ष खेळताना दिसला नाही, तरी तो ड्रेसिंग रूममध्ये संघासोबत राहून मार्गदर्शकाची भूमिका बजावेल. मैदानात असताना तो कर्णधार ऋतुराज गायकवाडला रणनीती आखण्यात मोलाची मदत करेल. धोनीचा अनुभव हा चेन्नईसाठी सर्वात मोठी ताकद आहे, त्यामुळे तो इम्पॅक्ट प्लेयर म्हणून किंवा मर्यादित षटकांच्या भूमिकेत दिसला तरी चाहत्यांसाठी ती मेजवानीच असेल. मात्र, सध्या त्याच्या तंदुरुस्तीवरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Asian Games: भारत अन् आशियाई पदकं; अंतिम क्षणी का चुकतो 'सुवर्ण' निशाणा? क्रीडा संस्कृतीत बदलाची गरज

Kendra Drishti Yoga 2026: करिअरमध्ये येणार सोन्याचे दिवस! केंद्र दृष्टी योग 'या' राशींना करणार मालामाल; 2 ऑक्टोबरपासून मिळणार अफाट यश

IT ची हाय-फाय नोकरी सोडली, बंगळुरुत चालवते रॅपिडो ऑटो, कॉर्पोरेट नोकरीपेक्षा कमावते जास्त पैसे; आईसाठी तरुणीनं उचललं मोठं पाऊल

पाकिस्तानात सुरक्षेची ऐशीतैशी! दरोडेखोरांनी थेट खेळाडूंच्या बसलाच केलं टार्गेट; बंदुकीचा धाक दाखवत पैशांची मागणी अन् मारहाण

Goa Paddy Farming: पावसाने आणखी दडी मारली तर भातशेती धोक्यात; कणसे धरण्याच्या काळात कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT