MS Dhoni
MS Dhoni  Dainik Gomantak
क्रीडा

आपली चूक मान्य करत महेंद्रसिंग धोनी म्हणाला....

दैनिक गोमन्तक

रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला (CSK) दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नईचा सात गडी राखून पराभव केला. सामन्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मान्य केले की प्रथम फलंदाजी करणे हा अजिबात योग्य निर्णय नव्हता. (MS Dhoni accepted his mistake in IPL match against Gujarat Titans)

या निर्णयामुळे फलंदाजांची चांगलीच अडचण झाली. दुसऱ्या डावात चेंडू सहज बॅटवर येत असल्याने गुजरातला त्याचा फायदा झाला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीच्या वेळी महेंद्रसिंग धोनी म्हणाला होता की, आपण हे सूर्यप्रकाशामुळे केले आहे, तसेच हवामानानुसार खेळपट्टीचे वर्तन बदलेल. पण एमएस धोनीचा हा निर्णय चुकीचा ठरला, त्यानंतर त्यानेही तो मान्य केला.

सीएसकेचा कर्णधार म्हणाला की, आमच्या खेळाडूंनी चांगली गोलंदाजी केली. आम्ही शिवम दुबेला थोडे वर पाठवू शकलो असतो. एमएस धोनीने प्रथमच आयपीएलमध्ये खेळत असलेल्या श्रीलंकेचा गोलंदाज मथिशा पाथिरानाचेही कौतुक केले. धोनी म्हणाला की तो चांगला गोलंदाज आहे, काही प्रमाणात तो लसिथ मलिंगासारखा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Goa's News Wrap: ताळगाव निवडणूक निकाल, फोंड्यात खून; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT