Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI: Hit Man मोडणार मार्टिन गुप्टिलचा षटकारांचा वर्ल्ड रिकॉर्ड?

World Record: रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत एकूण 159 षटकार मारले आहेत.

दैनिक गोमन्तक

Rohit Sharma: रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत 159 षटकार मारले आहेत. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत तो सध्या न्यूझीलंडचा महान फलंदाज मार्टिन गुप्टिलच्या मागे आहे. रोहितने या फॉरमॅटमध्ये 10 षटकार अधिक मारले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत रोहितला गुप्टिलला मागे टाकण्याची संधी असेल. मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहितने 44 चेंडूत 64 धावा करुन फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले होते, त्यामुळे रोहित लवकरच गुप्टिलचा हा विक्रम मोडेल. गेल्या सामन्यात रोहितने या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत गुप्टिलला मागे टाकले होते.

दरम्यान, रोहितने 129 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 159 षटकार मारले आहेत, तर गुप्टिलने 116 सामन्यांमध्ये 169 षटकार मारले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) आजच्या सामन्यात रोहितने 11 षटकार मारले तर तो गुप्टिलला मागे टाकेल. दुसरीकडे, T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वाधिक धावांबद्दल बोलायचे झाल्यास, रोहितने 3443 धावा केल्या आहेत. तर गुप्टिलने 3399 धावा केल्या आहेत.

दुसरीकडे, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांच्या बाबतीत ख्रिस गेल (Chris Gayle) तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याच्या खात्यात 124 षटकार आहेत. चौथ्या क्रमांकावर इंग्लंडचा (England) माजी कर्णधार इऑन मॉर्गन आहे, ज्याने 120 षटकार ठोकले आहेत. ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंच या यादीत 117 षटकारांसह पाचव्या क्रमांकावर आहे. रोहित आणि गुप्टिल हे दोनच फलंदाज आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 150 हून अधिक षटकार मारले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Krishnaji Kank: फोंडा किल्ल्यासाठी शंभूराजे दौडत आले, गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज सैन्यासह पळत सुटला; शूरवीर कृष्णाजी कंकांची कथा

Terrorists Attack in India: हाफिज सईदकडून भारतावर हल्ल्याचा कट, बांगलादेशला 'लाँचपॅड' बनवण्याची तयारी; दहशतवादी सैफुल्लाहचा चिथावणीखोर VIDE0 व्हायरल

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

Pooja Naik: “संबंधितांची नावे उघड करावी, कोणाचीही गय करणार नाही”, पूजा नाईक प्रकरणी मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

SCROLL FOR NEXT