Jasprit Bumrah  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: 'या' गोलंदाजाने केला मोठा कारनामा, जसप्रीत बुमराहला सोडले मागे!

IPL 2023 चा दुसरा क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला.

Manish Jadhav

IPL 2023 चा दुसरा क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबईचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

आता या मोसमातील अंतिम सामन्यात 28 मे रोजी संघाचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. या सामन्यात गुजरातच्या एका गोलंदाजाने जसप्रीत बुमराहला मागे टाकत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

या गोलंदाजेन बुमराहलाही सोडले मागे

चालू मोसमात गुजरात टायटन्सकडून खेळणारा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या क्वालिफायर सामन्यात अतिशय धोकादायक गोलंदाजी केली. त्याने 2.2 षटकात केवळ 10 धावा देत 5 बळी घेतले.

यासह त्याने जसप्रीत बुमराहचा मोठा विक्रम मोडीत काढला. आयपीएलच्या प्लेऑफमध्ये मोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. याआधी मुंबई इंडियन्सच्या आकाश मधवालने एलिमिनेटर सामन्यात 5 धावांत 5 बळी घेतले होते.

या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे, तर मोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर, जसप्रीत बुमराह या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये त्याने 14 धावांत 4 बळी घेतले होते.

चालू मोसमात उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे

मोहित शर्माने आयपीएल 2023 च्या मोसमात 13 सामने खेळताना एकूण 24 विकेट घेतल्या आहेत. IPL 2023 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

त्याच्या आयपीएल (IPL) कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आतापर्यंत 99 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 116 विकेट्स घेतल्या आहेत. चालू मोसमात त्याने अनेक महत्त्वाच्या प्रसंगी संघाला विजय मिळवून देण्यासाठी जादू केली आहे.

टीम इंडिया परत येऊ शकतो

भारताकडून (India) खेळलेला हा वेगवान गोलंदाज सध्या आपल्या घातक गोलंदाजीमुळे चर्चेत आला आहे. या वेगवान गोलंदाजाच्या मदतीने गुजरात टायटन्स संघ आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे, जिथे त्याचा सामना 28 मे रोजी चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे.

आगामी काळात मोहित शर्माची कामगिरी अशीच राहिली तर त्याला टीम इंडियात पुनरागमनाची संधी दिली जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT