Mohammed Shami Dainik Gomantak
क्रीडा

'आम्ही देशासाठी लढतो'; धर्मावरुन टार्गेट करणाऱ्यांना शमीने दिले चोख प्रत्युत्तर

धर्माच्या आधारे ट्रोल करणारे खरे भारतीयही नाहीत, असे शमीने (Mohammed Shami) म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

T20 विश्वचषक 2021 मध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताचा पराभव झाल्यानंतर काही सोशल मीडिया यूजर्संनी सोशल मीडियावर मोहम्मद शमीवर (Mohammed Shami) टीकेची झोड उठवली होती. धर्माचा आधार घेत त्याच्याविरुद्ध फालतू गोष्टी बोलल्या गेल्या. या संदर्भातच आता मोहम्मद शमीची प्रतिक्रिया समोर आली आहे. अशाप्रकारच्या वक्तव्यांना कोणत्याही प्रकारचा इलाज नसल्याचे शमीने म्हटले आहे. धर्माच्या (Religion) आधारे ट्रोल करणारे खरे भारतीयही नाहीत, असेही शमीने म्हटले आहे. (Mohammed Shami Replies Who Target On The Basis Of Religion)

दरम्यान, एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना मोहम्मद शमीने ही माहिती दिली. टी-20 विश्वचषकादरम्यान निशाणा साधल्यानंतर तत्कालीन कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) शमीचा बचाव केला होता. खोडसाळपणे बोलणाऱ्यांना त्याने चोख प्रत्युत्तर दिले होते.

माध्यमाशी बोलताना शमी म्हणाला, ''जर तुम्ही एखाद्या खेळाडूला हिरो मानत असाल आणि त्यानंतर त्याच्याविरुध्द बाष्कळ बडबड करत असाल तर, तुम्ही भारताचे समर्थक नाहीत. मला वाटते की, अशा लोकांनी केलेल्या वक्तव्यांना काही फरक पडत नाही. जर मी एखाद्याला माझा आदर्श मानतो, तर मी त्याला कधीही वाईट बोलणार नाही. आणि विशेष म्हणजे जर कोणी माझ्याबद्दल वाईट बोलत असेल तर तो माझा किंवा भारतीय संघाचा चाहता नाही. तो काय म्हणतो याची मला पर्वा नाही.''

तसेच, शमी पुढे म्हणाला, ''ही लोकांची मानसिकता आहे. त्यातून ते एखाद्याशी कशापध्दतीने बोलतात ते दिसून येते. लोक सोशल मीडिया प्रोफाइल बदलून एखाद्यावर टीका करतात. पण जर आपण प्रतिक्रिया दिली तर आपण त्यांना अनावश्यक महत्त्व देऊ असं होईल. मला त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा वाग घालण्याची गरज वाटत नाही.''

'मला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही'

शमी पुढे म्हणाला, ''मला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. आम्ही काय आहोत हे आम्हाला माहित आहे. आम्हाला भारताबद्दल काय वाटते याबद्दल सांगण्याची काही एक गरज वाटत नाही. कारण आम्ही देशाचे प्रतिनिधित्व करतो आणि विशेष म्हणजे आम्ही देशासाठी लढतो. त्यामुळे अशा ट्रोल्सना प्रत्युत्तर देऊन किंवा प्रतिक्रिया देऊन काहीही सिद्ध करण्याची गरज नाही.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Velsao Pale: वेळसाव-पाळे येथे तणाव! दुहेरी ट्रॅकच्या कामावरुन रहिवासी रस्त्यावर; ‘गोंयचो एकवट’ पुन्हा सक्रिय

Rashi Bhavisha 06 November 2024: शेअर बाजारात गुंतवणूकीचा विचार करताय सावधान... जाणून घ्या काय सांगतयं 'या' राशीचं भविष्य

Goa News: खुशखबर! 'गोव्यात' मिळणार 'सरकारी' दराने भूखंड; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Cash For Job Scam: नोकरी घाेटाळ्‍याची दोरी 'वेगळ्यांच्याच' हातात! सीबीआय चौकशीची खासदार विरियातोंची मागणी

IFFI 2024: उत्‍सुकता वाढली! 'इफ्‍फी'त होणार तरंगणाऱ्या ‘यॉट’वर विशेष कार्यक्रम

SCROLL FOR NEXT