Mohammed Shami Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: मोहम्मद शमीच्या 'या' विचित्र वक्तव्याने उडाली खळबळ, म्हणाला...!

Mohammed Shami On IND vs NZ 2nd Odi: न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने वर्चस्व गाजवले.

दैनिक गोमन्तक

Mohammed Shami On IND vs NZ 2nd Odi: न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने वर्चस्व गाजवले. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांचा धुव्वा उडवत संघाच्या विजयाचा पाया रचला. या सामन्यात वरिष्ठ वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी टीम इंडियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मात्र, सामन्यानंतर त्याने मोठे वक्तव्य केले.

मोहम्मद शमीने हे मोठे वक्तव्य केले आहे

न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी भारतीय संघाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला. या सामन्यात 6 षटके टाकताना शमीने 3.00 च्या इकॉनॉमीसह 18 धावा केल्या आणि 3 खेळाडू बाद केले. या शानदार खेळासाठी त्याला सामनावीर (MOM) पुरस्कारही देण्यात आला.

मात्र, सामन्यानंतर शमी म्हणाला की, 'मी जेव्हा गोलंदाजी सुरु करतो, तेव्हा मी लाइन आणि लेन्थवर लक्ष देतो. कधी कधी असं होतं की तुम्ही चांगली गोलंदाजी करता आणि विकेट मिळत नाहीत. कधी कधी खराब चेंडूंवरही विकेट्स मिळतात. माझा विश्वास आहे की, तुम्ही जितका जास्त वेळ घालवाल तितके चांगले फळ तुम्हाला मिळेल.'

अशा प्रकारे दोन्ही संघांमधील हा सामना रंगला

या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने (Team India) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ 108 धावांवर गडगडला. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने या सामन्यात सर्वाधिक 3 बळी घेतले.

तर हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदरने 2-2 विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनीही 1-1 विकेट घेण्यात यश मिळवले. यानंतर 109 धावांचे लक्ष्य टीम इंडियाने केवळ 2 गडी गमावून पूर्ण केले. कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 51 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तरुणीची अजब ड्रायव्हिंग स्टाईल व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटीझन्स लोटपोट; म्हणाले, ''ब्रेकअप करुन आली...''

शनिदेवाची वक्रदृष्टी संपली, आता सुरु होणार सुखाचे दिवस! 'या' दोन राशींचे भाग्य अचानक चमकणार; डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार खास

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

SCROLL FOR NEXT