Mohammadreza Shadlou Dainik Gomantak
क्रीडा

Pro Kabaddi 2023: इराणचा मोहम्मदरेझा शादलू ठरला सर्वात महागडा खेळाडू, पुणेरी पलटणने मोजले एवढे कोटी

Pro Kabaddi 2023 Updates: इराणचा युवा डिफेंडर मोहम्मदरेझा शादलू हा प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल) इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

Manish Jadhav

Pro Kabaddi 2023 Updates: इराणचा युवा डिफेंडर मोहम्मदरेझा शादलू हा प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल) इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. PKL च्या 10 व्या हंगामापूर्वी सोमवारी (Pro Kabaddi League 2023 Auction) झालेल्या लिलावात शादलूला पुणेरी पलटणने 2 कोटी 35 लाख रुपयांना विकत घेतले. अनेक संघांनी त्याच्यासाठी बोली लावली पण शेवटी पुणेरी पलटणने बाजी मारली.

दरम्यान, शादलूची बेस प्राइज 30 लाख रुपये होती. 2015 च्या चॅम्पियन U-Mumba ने त्याच्यासाठी पहिली बोली लावली. यानंतर बंगाल वॉरियर्सने या बोलीत उडी घेतली. त्यानंतर युपी योद्धानेही बोलीत उडी घेतली.

गुजरात जायंट्सनेही शादलूला आपल्या संघात सामील करुन घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि एक कोटी रुपयांची बोली लावली पण त्यानंतर या इराणी खेळाडूला खरेदी करण्यात पुणेरी पलटणला यश आले.

त्याचवेळी, इराणच्या (Iran) फाझल अत्राचलीला गुजरात जायंट्सने 1.60 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याची बेस प्राइज 30 लाख रुपये होती. शादलूपूर्वी पवन सेहरावत हा पीकेएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू होता.

PKL लिलावात पवन 2.26 कोटी रुपयांना विकला गेला होता, पण आता शादलू 2.35 कोटी रुपयांना विकला गेल्याने PKL चा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. शादालूने पीकेएलमध्ये आतापर्यंत फक्त दोन हंगाम खेळले आहेत.

त्याने आपल्या पीकेएल करिअरची सुरुवात पटना पायरेट्सकडून केली. 8व्या मोसमात, तो 89 टॅकल पॉइंट्ससह आणि शेवटच्या हंगामात 84 गुणांसह मोसमातील दुसरा सर्वोत्तम डिफेंडर बनला होता. शादालूने आतापर्यंत दोन हंगामात 44 सामन्यांत 183 गुण मिळवले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT