Team India
Team India Dainik Gomantak
क्रीडा

भारतीय चाहत्यांसाठी मोठी बातमी, हा गोलंदाज T20 World Cup साठी ऑस्ट्रेलियाला होणार रवाना

दैनिक गोमन्तक

Team India For T20 World Cup 2022: T20 वर्ल्ड कप 2022 सुरु होण्याच्या काही दिवस आधी टीम इंडियासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचा एक घातक गोलंदाज पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. टीम इंडियामध्ये सहभागी होण्यासाठी हा खेळाडू लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी या खेळाडूलाही संघात संधी मिळू शकते.

हा खेळाडू लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार

जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) T20 विश्वचषक 2022 मधून वगळणे टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. मात्र यादरम्यान संघासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. इनसाइड स्पोर्टच्या अहवालानुसार, भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) एनसीए (National Cricket Academy) मधील फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे. दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी मोहम्मद शमीला कोरोनाची लागण झाली होती, मात्र तो आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे.

शमीला संधी मिळू शकते

BCCI लवकरच 2022 च्या T20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) बुमराहऐवजी दुसऱ्या गोलंदाजाचा संघात समावेश करणार आहे. या शर्यतीत मोहम्मद शमीचाही समावेश आहे. मोहम्मद शमी गेल्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीमचा भाग होता. मोहम्मद शमीने गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात नामिबियाविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता. शमीने भारतासाठी आतापर्यंत एकूण 17 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 9.55 च्या इकॉनॉमीने केवळ 18 विकेट्स घेतल्या आहेत.

T20 विश्वचषकासाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल अर्शदीप सिंग.

स्टँडबाय खेळाडू- मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

Goa Election 2024 Voting Live: राज्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

China Crime: धक्कादायक! चीनमध्ये माथेफिरुने केलेल्या चाकू हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू; तर 23 जण जखमी

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

SCROLL FOR NEXT