Indian Women's Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

मिताली राज-स्मृती मानधना क्रमवारीतुन घसरल्या तर, या 2 भारतीय खेळाडूंचे नशीब चमकले

मिताली आता 4 स्थानावरती गेली आहे, तर मानधना 10 व्या स्थानावरती घसरली आहे.

दैनिक गोमन्तक

मंगळवारी जाहीर झालेल्या ताज्या ICC एकदिवसीय क्रमवारीत भारताच्या महिला क्रिकेट (Indian women's cricket) संघातील दोन मोठ्या खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला. एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राज (Mithali Raj) आणि सलामीवीर स्मृती मानधना (Smriti Mandhana) यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीत काही स्थान गमावले आहे. मिताली आता 4 स्थानावरती गेली आहे, तर मानधना 10 व्या स्थानावरती घसरली आहे. मितालीला सध्या 718 तर मंधानाला 670 गुण आहेत, हे दोन्ही खेळाडू सध्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भाग घेणार आहेत. (Mithali Raj Smriti mandhana slipped from rankings)

पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात मिताली नऊ धावा करून आऊट झाली तर मंधानाने 52 चेंडूत 75 धावा केल्या आहेत. रविवारी झालेल्या या सामन्यात भारताने (Indian Cricket Team) बाजी मारली, तर भारताला पुढचा सामना न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) खेळायचा आहे.

स्नेह-पूजेचा झालेला लाभ,

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढणाऱ्या स्नेह राणा आणि पूजा वस्त्राकर यांनी क्रमवारीत प्रगती केली. राणाने 53 धावांची नाबाद खेळी तर पूजाने 67 धावांची खेळी केली आहे. या दोन्ही खेळाडूंनी आपापल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी गाठण्यात यश मिळाले आहे. पूजा 64 व्या स्थानावरती आली. मात्र, राणा अद्याप टॉप-100 मध्ये आलेली नाहीये.

गोलंदाजांची ही अवस्था,

गोलंदाजांच्या क्रमवारीत अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी चौथ्या स्थानावरती आहे. दुसरीकडे, फिरकीपटू दीप्ती शर्मा अष्टपैलूंच्या क्रमवारीत एका स्थानाने घसरून सहाव्या स्थानावरती आली आहे. विश्वचषकाच्या पहिल्या पाच सामन्यांनंतर अनेक चढ-उतार झाले आहेत. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंगने फलंदाजांच्या क्रमवारीत दोन स्थानांची प्रगती केली. ती आता एक स्थानावरती आहे आणि तिची प्रथम क्रमांकाची सहकारी अॅलिसा हिलीपेक्षा 15 गुणांनी मागे आहे.

लेनिंगने पहिल्या सामन्यात विद्यमान विजेत्या इंग्लंडविरुद्ध 110 चेंडूत 86 धावांची खेळी खेळली होती, तर या सामन्यात संघाने बाजी मारली होती. 131 चेंडूत 130 धावा करणाऱ्या रॅचेल हेन्सने सहा स्थानांनी प्रगती करत टॉप-10 मध्ये स्थान मिळवले आहे. ती सातव्या स्थानावरती पोहोचली आहे. Nate Sciver पाच स्थानांनी प्रगती करत सहाव्या क्रमांकावरती पोहोचली आहे.

याचा फायदा वेस्ट इंडिजच्या खेळाडूला मिळाला आहे,

वेस्ट इंडिजच्या (West Indies) हेली मॅथ्यूजने फलंदाजी, गोलंदाजी आणि अष्टपैलू या तिन्ही क्रमवारीत प्रगती केली. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात तिने दमदार खेळ दाखवला आणि तिला सामनावीर म्हणून निवडण्यात आले आहे. तिने 119 धावा केल्या आणि तीन विकेटही घेतल्या. अष्टपैलूंच्या क्रमवारीत ती टॉप-5 मध्ये आली. ती सहा स्थानांनी पुढे जात चौथ्या स्थानावरती आली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत तिने 12 स्थानांनी झेप घेत 20 व्या क्रमांकावरती झेप घेतली आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत ती 3 स्थानांनी पुढे सरकत 10व्या स्थानावरती पोहोचली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT