Mithali Raj  Dainik Gomantak
क्रीडा

Mithali Raj Surpass MS Dhoni: मिताली राजने मोडला धोनीचा रेकॉर्ड

भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women's Cricket Team) न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात शानदार विजयाची नोंद केली आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women's Cricket Team) न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात शानदार विजयाची नोंद केली आहे. पहिले चार सामने गमावल्यानंतर टीम इंडियाने (Team India) शेवटच्या सामन्यात 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 46 षटकांत न्यूझीलंडचा पराभव केला. भारताच्या विजयात स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) 71 आणि हरमनप्रीत कौरने 63 धावा केल्या. कर्णधार मिताली राजनेही नाबाद 57 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. मिताली राजच्या (Mithali Raj) या अफलातून खेळीने धोनीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. (Mithali Raj Has Broken MS Dhoni's Record)

दरम्यान, मिताली राज पाठलाग करताना विजय मिळवणारी सर्वोत्तम भारतीय खेळाडू ठरली आहे. वनडे क्रिकेटमध्ये विजयाचा पाठलाग करताना मितालीची सरासरी 109.05 आहे. तिने या कालावधीत 2181 धावा केल्या आहेत.

तसेच, धोनीने धावांचा पाठलाग करताना 102.71 च्या सरासरीने 2876 धावा केल्या. मात्र, आता मिताली राजने त्याला मागे टाकले आहे. विराट कोहलीने विजयाचा पाठलाग करताना 94.66 च्या सरासरीने 5396 धावा केल्या आहेत. स्मृती मानधना देखील पाठलाग करण्यात माहिर आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना तिने 69.94 च्या सरासरीने 1189 धावा केल्या आहेत. सुरेश रैनाने 66.60 च्या सरासरीने 1865 धावा केल्या आहेत. स्मृती मंधानाने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. 84 चेंडूत 71 धावांची उत्कृष्ट खेळी स्मृतीने केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

SCROLL FOR NEXT