Mitchell Starc Dainik Gomantak
क्रीडा

AUS vs SA Test: भर सामन्यात स्टार्कची दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला धमकी, क्रिज सोडली तर...

ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला धमकी देताना दिसला.

Pranali Kodre

Mitchell Starc: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील मेलबर्नला झालेल्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने 1 डाव आणि 182 धावांनी विजय मिळवला. मात्र, या सामन्यादरम्यान मिशेल स्टार्क दक्षिण आफ्रिकेच्या नॉन स्ट्रायकर एन्डच्या फलंदाजाला धावबाद करण्याची धमकी देताना दिसला.

सामन्याच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना 17 व्या षटकात ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क गोलंदाजीला आला होता. त्यावेळी अखेच्या चेंडूवर सारेल एरवी फलंदाजी करत होता, तर थेयुनिस डी ब्रुइन नॉन स्ट्रायकर एन्डला होता.

पण, स्टार्कने 17 व्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्याआधीच थेयुनिस डी ब्रुइन क्रिजच्या पुढे आला होता. ते पाहून स्टार्कने तो चेंडू टाकला नाही, तर त्याने रागात थेयुनिस डी ब्रुइनला क्रिज न सोडण्याबाबत धमकावले.

दरम्यान, स्टार्कचा धमकावतानाचा आवाजही स्टंप माईकमधून ऐकू आला. तो म्हणाला की 'क्रिजमध्येच राहा, ते तेवढं अवघड नाही. मित्रा, त्याचसाठी क्रिजचा वापर होतो.'

दरम्यान, नॉन-स्ट्रायकर एन्डच्या फलंदाजाला धावबाद करण्यासाठी यापूर्वी मंकड असा शब्दप्रयोग केला जायचा. मात्र, क्रिकेटच्या नव्या नियमानुसार नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाचे धावबादही सर्वसाधारण धावबाद सारखेच समजले जाते. तसेच त्यालाही धावबादच म्हटले जाते.

काही दिवसांपूर्वीच भारतीय महिला संघाची अष्टपैलू दिप्ती शर्मा हिने इंग्लंडच्या शारलोट डिनला अशाप्रकारे धावबाद केले होते. त्यामुळे भारताने लॉर्ड्सवरील वनडे सामना जिंकला होता. त्यावेळी या नियमाबद्दल बरीच चर्चा झाली होती. अनेक इंग्लिश क्रिकेटपटूंनी याला विरोध केला होता, तर अनेकांनी दिप्तीला पाठिंबा दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT