India vs Australia BCCI
क्रीडा

World Cup 2023: भारत-ऑस्ट्रेलिया फायनल खेळणार, पण मार्शने IPL दरम्यान केलेली 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

Mitchell Marsh: वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणार असल्याने मिचेल मार्शने आयपीएलदरम्यान केलेली भविष्यवाणी चर्चेत आली आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Australia Final, Mitchell Marsh Prediction:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील दोन अंतिम संघ मिळाले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात या स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात अंतिम सामना होणार असल्याने 6 महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्शने केलेली भविष्यवाणी चर्चेत आली आहे.

32 वर्षीय मार्शने आयपीएल 2023 स्पर्धेदरम्यान मे महिन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना भविष्यवाणी केली होती की भारत आणि ऑस्ट्रेलिया हे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत अंतिम सामन्यात खेळतील. तसेच त्याने कोणता संघ किती धावांनी जिंकेल, हेही सांगितले होते.

त्याने म्हटले होते की ऑस्ट्रेलिया तब्बल 385 धावांनी सामना जिंकेल. तो दिल्ली कॅपिटल्सच्या पॉडकास्टमध्ये म्हटला होता की 'ऑस्ट्रेलिया अपराजित राहिल आणि भारताला अंतिम सामन्यात पराभूत करेल. ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात 2 बाद 450 धावा करेल आणि भारताला 65 धावात सर्वबाद करेल.'

दरम्यान, आता त्याने सांगितलेल्या त्याच्या अंदाजानुसार भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामना तर खेळणार आहेत, पण आता त्याने धावांबद्दल केलेला अंदाज खरा ठरणार का, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये असेल.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी मार्श वर्ल्डकप 2023 स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहचलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याने ऑस्ट्रेलियाकडून चांगली कामगिरीही केली आहे. त्याने 9 सामन्यांत 53.25 च्या सरासरीने 426 धावा केल्या आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलियाची कामगिरी

उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडला, तर ऑस्ट्र्लियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. भारतीय संघ या स्पर्धेत अद्याप अपराजित राहिला आहे. भारताने 10 पैकी 10 सामने जिंकले आहेत, तसेच ऑस्ट्रेलियाने स्पर्धेतील पहिले दोन सामने पराभूत झाल्यानंतर पुढील सर्व 8 सामन्यात विजय मिळवला आहे.

दरम्यान, भारतीय संघ 19 नोव्हेंबरला चौथ्यांदा, तर ऑस्ट्रेलिया आठव्यांदा वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळताना दिसणार आहे. तसेच 2003 नंतर 20 वर्षांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळताना दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT