MI New York Dainik Gomantak
क्रीडा

MLC 2023: मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराचं ऐतिहासिक शतक! MI न्युयॉर्क ने कोरले विजेतेपदावर नाव

MI New York: अमेरिकेतही मुंबई इंडियन्सचा जलवा पाहायला मिळाला असून एमआय न्युयॉर्क संघाने MLC 2023 विजेतेपदावर नाव कोरले आहे.

Pranali Kodre

MI New York win Major League Cricket 2023 Title : अमेरिकेत पार पडलेल्या मेजर लीग क्रिकेट 2023 स्पर्धेचे विजेतेपद मुंबई इंडियन्सची मालकी असलेल्या एमआय न्युयॉर्क संघाने विजेतेपद जिंकले आहे.

रविवारी झालेल्या अंतिम सामन्या एमआय न्युयॉर्कने सिएटल ओर्कास संघाला 24 चेंडू राखून 7 विकेट्सने पराभूत करत हे विजेतेपद जिंकले. न्युयॉर्कच्या विजयात कर्णधार निकोलस पूरनने शतकी खेळी करत महत्त्वाची भूमिका बजावली.

या सामन्यात सियाटेल ऑर्कासने एमआय न्युयॉर्कला 184 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग एमआय न्युयॉर्कने 16 षटकात 3 विकेट्स गमावत सहज पूर्ण केला.

या सामन्यात एमआय न्युयॉर्कने स्टीव्हन टेलर आणि शायन जहांगिर यांच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या होत्या. पण नंतर कर्णधार निकोलस पूरनने शानदार शतकी खेळी केली. त्याने आक्रमक खेळ करताना 16 चेंडूत अर्धशतक आणि नंतर केवळ 40 चेंडूत शतक पूर्ण केले.

त्याला दुसऱ्या बाजूने डेवाल्ड ब्रेविसने संयमी खेळत चांगली साथ दिली होती. पण ब्रेविस 20 धावांवर बाद झाला. पण नंतर निकोलस पूरनने आपली लय कामय ठेवत संघाला विजय मिळवून दिला.

पूरन 55 चेंडूत 10 चौकार आणि 13 षटकारांसह 137 धावा करून नाबाद राहिला. त्यामुळे या स्पर्धेच्या पहिल्याच अंतिम सामन्यात शतक केल्याने पूरनचे नावाची नोंद इतिहासात झाली आहे. तसेच एमआय न्युयॉर्कचा टीम डेव्हिड 10 धावांवर नाबाद राहिला.

दरम्यान सियाटेल आर्कासकडून इमाद वासिम आणि वेन पार्नेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या सियाटेल आर्कासकडून क्विंटन डी कॉकने सलामीला फलंदाजी करताना 52 चेंडूत 87 धावांची खेळी केली. त्याच्याशिवा. शुभम रांजणे (29), ड्वेन प्रीटोरियस (21) आणि शेहान जयसुर्या (16) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. त्यामुळे त्यांना 20 षटकात 9 बाद 183 धावा करता आल्या.

एमआय न्युयॉर्ककडून गोलंदाजी करताना ट्रेंट बोल्ट आणि राशिद खान यांनी सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच स्टीव्हन टेलर आणि डेव्हिड विसे यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa RTI Fine: माहिती अधिकारातील टाळाटाळ भोवली; म्हापसा पालिकेच्या अधिकाऱ्याला 'इतक्या' हजारांचा दंड

Diwali Travel 2026: 'Goa Trip' महागणार! दिवाळीत गोव्यातील हॉटेल्सच्या दरांत 42% वाढीचा अंदाज; व्हिलाचे भाडे तब्बल 5.8 लाखांवर

Meta Fine 25 Billion Dollars: डेटा प्रायव्हसी प्रकरणात 'मेटा'ला झटका! कोर्टाने ठोठावला 2.36 लाख कोटींचा दंड; सिलिकॉन व्हॅली हादरली

Salaulim Dam Affected People: 40 वर्षांपासून प्रलंबित साळावली धरणग्रस्तांचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Russian Woman Viral Video: 'पाणीपुरी नको!' म्हणत रशियन महिलेनं फिरवली पाठ; पण भेळपुरीची चव चाखताच म्हणाली, Wow.... पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT