India vs England | Memes Viral 
क्रीडा

World Cup 2023: भारताने इंग्लंडला हरवताच चाहत्यांना आठवला 'लगान', भन्नाट मीम्स व्हायरल

India vs England: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारताने लखनऊमध्ये इंग्लंडला पराभूत केल्यानंतर सोशस मीडियावर अनेक भन्नाट मीम्स व्हायरल झाले होते.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs England, Memes Viral:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी भारत विरुद्ध इंग्लंड संघात लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात भारताने 100 धावांनी विजय मिळवला.

या विजयासह भारताने उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास पक्का केला आहे. मात्र, इंग्लंडसाठी उपांत्य फेरीची गणिते बिघडली आहेत.

हा भारताचा या स्पर्धेतील सलग सहावा विजय होता. भारताने या स्पर्धेत आत्तापर्यंत खेळलेल्या सर्व 6 सामन्यांत विजय मिळवला आहे. तसेच गतविजेत्या इंग्लंडने मात्र या स्पर्धेतील पाचवा पराभव पत्करला. इंग्लंडने सहापैकी केवळ एकच विजय मिळवला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मीम्स व्हायरल होत आहेत.

अनेक चाहत्यांना भारताच्या या विजयामुळे लगान चित्रपट आठवला आहे, ज्यात भारतीय संघ इंग्लंडच्या संघाला हरवते. तसेच अनेकांनी असेही म्हटले आहे की 2022 टी20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने भारताला स्पर्धेतून बाहेर केले, त्याचा वचपा आता भारतीय संघाने वर्ल्डकप 2023 मध्ये घेतला आहे. याबरोबरच अनेक मीम्सही व्हायरल झाले आहेत.

दरम्यान सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास, या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 87 धावांची खेळी केली. तसेच सूर्यकुमार यादवने 49 धावा केल्या, तर केएल राहुलने छोटेखानी पण महत्त्वपूर्ण 39 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने 50 षटकात 9 बाद 229 धावा उभारल्या.

इंग्लंडकडून गोलंदाजी करताना डेव्हिड विलीने 3 विकेट्स घेतल्या, तसेच ख्रिस वोक्स आणि आदिल राशिदने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच मार्क वूडने 1 विकेट घेतली.

त्यानंतर 230 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 34.5 षटकात 129 धावातच सर्वबाद झाला. इंग्लंडकडून लियाम लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक 27 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय कोणालाही 20 धावांचा टप्पाही पार करता आला नाही.

भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराहने 3 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादवने 2 विकेट्स आणि रविंद्र जडेजाने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ओंकार' हत्तीची शेतात अचानक एन्ट्री... म्हशींनी जीव वाचवण्यासाठी ठोकली धूम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Gujarat ATS Foils Terror Plot: मोठा दहशतवादी कट उधळला! गुजरात एटीएसने अहमदाबादमध्ये शस्त्रसाठ्यासह तिघांना ठोकल्या बेड्या; दहशतवादी नेटवर्क हादरले VIDEO

मासेविक्री बाजाराची दुरवस्था कायम, माशांच्या तुटवड्याने दर गगनाला भिडले; विक्रेत्यांचा SGPDA वर संताप

CM सावंतांच्या हस्ते Ironman 70.3 चा शुभारंभ! तेजस्वी सूर्या, अन्नामलाई, सैयामी खेर यांच्यासह 31 देशांतील 1300 ॲथलीट्सची उपस्थिती

Kidney Disease: चिंताजनक! किडनी विकारात भारत जगात दुसऱ्या स्थानी, 13.8 कोटी लोक प्रभावित; लॅन्सेटच्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT