Footballer Maximiliano Araujo Have Roots In Goa Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Footballer Maximiliano Araujo Have Roots In Goa: सामन्याच्या 80व्या मिनिटाला जेव्हा उरुग्वेवर पराभवाचे सावट होते, तेव्हा अराउजोने हा गोल करुन सामन्याचे चित्रच पालटले.

Manish Jadhav

Fotballer Maximiliano Araujo Have Roots In Goa: फिफा वर्ल्ड कप 2026 मधील ग्रुप-एच च्या एका अटीतटीच्या सामन्यात मॅक्सिमिलियानो अराउजोने शेवटच्या क्षणांमध्ये केलेल्या उत्कृष्ट गोलच्या जोरावर उरुग्वेने सौदी अरेबियाविरुद्धचा सामना 1-1 असा ड्रॉ केला. या महत्त्वपूर्ण गोलमुळे उरुग्वेने आपल्या वर्ल्ड कप मोहिमेची निराशाजनक सुरुवात होण्यापासून स्वतःला वाचवले. अराउजोने संघाला एक मोलाचा गुण मिळवून दिला. हा सामना सोमवारी (15 जून) खेळला गेला, परंतु भारतीय वेळेनुसार तेव्हा 16 जूनचा दिवस उजाडला होता.

सामन्याच्या 80व्या मिनिटाला जेव्हा उरुग्वेवर पराभवाचे सावट होते, तेव्हा अराउजोने हा गोल करुन सामन्याचे चित्रच पालटले. या गोलमुळे केवळ उरुग्वेच्या संघातच नव्हे, तर गोव्यातील एका छोट्याशा गावातही आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

उरुग्वेचा हा स्टार फुटबॉल स्टार मॅक्सिमिलियानो अराउजो याचे दक्षिण गोव्यातील (South Goa) लोटली या गावाशी थेट संबंध आहे. लोटली हे गाव आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार मारियो मिरांडा यांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. मॅक्सिमिलियानोचे आजोबा, रेडुआल्डो अराउजो हे मूळचे लोटलीचे रहिवासी होते.

चांगल्या संधींच्या शोधात परदेशात गेलेल्या अनेक गोमंतकीयांप्रमाणे ते देखील आधी अंगोला आणि नंतर ब्राझीलमध्ये गेले. अखेर ते उरुग्वेमधील 'रिवेरा' येथे स्थायिक झाले, जिथे मॅक्सिमिलियानोचा जन्म झाला आणि तो लहानाचा मोठा झाला. आपल्या पूर्वजांच्या गावातील मुलाने जागतिक मंचावर चमक दाखवल्याने गोमंतकीयांचा ऊर अभिमानाने भरुन आला.

26 वर्षांचा हा प्रतिभावान फुटबॉलपटू सध्या पोर्तुगालच्या प्रसिद्ध 'स्पोर्टिंग सीपी' क्लबसाठी खेळतो आणि त्याने अत्यंत कमी वेळात उरुग्वेच्या राष्ट्रीय संघात आपले स्थान पक्के केले. 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केल्यापासून मॅक्सिमिलियानो अराउजो हा उरुग्वेच्या आक्रमणाचा मुख्य कणा बनला. त्याने आतापर्यंत 14 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 4 गोल केले आहेत. यापूर्वी 2024 च्या कोपा अमेरिका स्पर्धेतही त्याने 6 सामन्यांत 2 गोल करत उरुग्वेला तिसऱ्या स्थानी पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सौदी अरेबियाविरुद्धच्या या सामन्यात जेव्हा उरुग्वेचा संघ एका अनपेक्षित पराभवाच्या छायेत होता, तेव्हा अराउजोने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली. 80व्या मिनिटाला मिळालेल्या संधीचे सोने करत त्याने केलेल्या गोलमुळे उरुग्वेने हा सामना बरोबरीत सोडवला. जागतिक फुटबॉलमधील या गोमंतकीय कनेक्शनची सध्या सोशल मीडिया आणि फुटबॉल जगतात जोरदार चर्चा सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: गटारी पार्टीत शिजले राजकारण?

VIDEO: गोव्यात प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा अपघात! दुचाकीवरील बाप-लेकाला धडक दिल्याचा आरोप, स्थानिकांशी वादाचा व्हिडिओ व्हायरल

Pilgaon Panchayat: आम्हाला 'फ्लायओव्हर' नकोच, पिळगाव ग्रामसभेत ठराव; 'मायनिंग' विषयही गाजला

Cristiano Ronaldo Retirement: फुटबॉल चाहत्यांना मोठा धक्का! ख्रिस्तियानो रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर, म्हणाला, 'हे माझं शेवटचं...'

काँग्रेस अध्यक्ष खर्गे सोमवारपासून 2 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर, संघटनात्मक तयारीवर दक्षिण गोव्यात होणार 'पीएसी'ची महत्त्वपूर्ण बैठक

SCROLL FOR NEXT