England Cricketer Banned Match Fixing Punishment Dainik Gomantak
क्रीडा

Match Fixing: मॅच फिक्सिंगचा आरोप असणाऱ्या इंग्लंडच्या क्रिकेटपटूवर ICC ची मोठी कारवाई; साडे17 वर्षांची घातली बंदी

England Cricketer Banned Match Fixing Punishment: इंग्लंड क्रिकेटला मोठा धक्का बसला असून आयसीसीने त्यांच्या एका क्रिकेटपटूवर साडे17 वर्षांची बंदी घातली आहे.

Manish Jadhav

England Cricketer Banned Match Fixing Punishment: इंग्लंड क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात संघाला पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. दरम्यान, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

इंग्लंड क्रिकेटला मोठा धक्का बसला असून आयसीसीने त्यांच्या एका क्रिकेटपटूवर साडे17 वर्षांची बंदी घातली आहे. हा क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळला. एकूण आठ क्रिकेटपटूंवर आरोप ठेवण्यात आले होते, त्यापैकी एक हा इंग्लंडचा क्रिकेटर होता आणि त्याच्या चौकशीत आयसीसीने त्याच्यावर तीन वेगवेगळ्या प्रसंगी फिक्सिंगसाठी इतर खेळाडूंना भेटवस्तू दिल्याचा आरोप केला आहे.

कोण आहे हा क्रिकेटर?

दरम्यान, लंडन क्लबचा क्रिकेटर रिझवान जावेद अबू धाबी टी10 क्रिकेट लीगदरम्यान मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळला. हे प्रकरण 2021 चे सांगण्यात येत आहे. रिजवानने तीन वेळा मॅच फिक्सिंगसाठी इतर खेळाडूंना भेटवस्तू दिल्याचे आयसीसीच्या तपासात आढळून आले. आयसीसीने त्याला भ्रष्टाचार (Corruption) आणि मॅच फिक्सिंग प्रकरणी दोषी ठरवले. यामुळे त्याच्यावर आता साडे17 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. हे आरोप गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये करण्यात आले होते.

दुसरीकडे, रिजवान जावेदसोबतच बांगलादेशचा आंतरराष्ट्रीय खेळाडू नासिर हुसेनही यामध्ये दोषी आढळला होता. हुसेनवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणी आयसीसीचे महाव्यवस्थापक इंटिग्रिटी ॲलेक्स मार्शल यांनी सांगितले की, रिझवान जावेदने आपल्या कृतीची वारंवार पुनरावृत्ती केल्यामुळे त्याच्यावर इतकी दीर्घ बंदी घालण्यात आली आहे. अशा चुकीच्या गोष्टींना क्रिकेटमध्ये (Cricket) कोणत्याही स्तरावर स्थान मिळणार नाही, असा स्पष्ट संदेश हे करणाऱ्यांना जावा यासाठी ही बंदीही मंजूर करण्यात आली.

या 5 प्रकरणात दोषी ठरला

कलम 2.1.1 – अबू धाबी T10 लीग 2021 चे सामने पार्टी फिक्सिंग केल्याचा आरोप.

कलम 2.1.3 – सामने फिक्स करण्यासाठी इतर खेळाडूंना भेटवस्तू दिल्याचा आरोप.

कलम 2.1.4 – मॅच फिक्सिंगसाठी इतर खेळाडूंना तयार केल्याचा आरोप.

कलम 2.4.4 – DACO ला याबद्दल संपूर्ण माहिती न दिल्याचा आरोप.

कलम 2.4.6 – DACO च्या तपासात सहकार्य न केल्याचाही आरोप करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

Goa Today's Live News: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार!

Honda IDC: अनेकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी बनलेली सत्तरीतील 'ती औद्योगिक वसाहत पडलीये ओसाड

Chitrasangam 2024: प्रतिभावंतांचा कलाबहर! 'चित्रसंगम'मध्ये 17 चित्रकारांच्या कलाकृती

SCROLL FOR NEXT