Match between Kerala Blasters and Mumbai City postponed Dainik Gomantak
क्रीडा

Sports: केरळा ब्लास्टर्स, मुंबई सिटी यांच्यातील सामना लांबणीवर

आणखी एका संघाला फटका; केरळा ब्लास्टर्सपाशी अपुरे खेळाडू

दैनिक गोमन्तक

Sports: कोविड महामारीचा इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात आणखी एका संघाला फटका बसला. सामन्यासाठी केरळा ब्लास्टर्स (Kerala Blasters) संघापाशी अपुरे खेळाडू असल्याचे कारण देत रविवारी नियोजित असलेला त्यांचा मुंबई सिटीविरुद्धचा सामना लांबणीवर टाकण्यात आला.

केरळा ब्लास्टर्स व मुंबई सिटी यांच्यातील सामना वास्को (Vasco) येथील टिळक मैदानावर खेळला जाणार होता. हा सामना आता नव्या तारखेला खेळविण्यात येईल, असे आयएसएलने नमूद केले. कोविड महामारीच्या (Corona) तिसऱ्या लाटेत गोव्यात सुरू असलेल्या स्पर्धेत पुढे ढकलण्यात आलेला हा तिसरा सामना आहे. 8 जानेवारी रोजी एटीके मोहन बागान व ओडिशा एफसी यांच्यातील, तर 15 जानेवारी रोजी एटीके मोहन बागान व बंगळूर एफसी यांच्यातील सामना झाला नव्हता.

केरळा ब्लास्टर्स संघापाशी या सामन्यासाठी आवश्यक खेळाडू नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लीग वैद्यकीय समितीशी सल्लामसलत करून सामना लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयएसएलने रविवारी जाहीर केले. स्पर्धेत सध्या केरळा ब्लास्टर्सचे 11 सामन्यांतून 20 गुण असून ते पहिल्या स्थानी आहेत. गतविजेत्या मुंबई सिटी संघाने 11 लढतीत 17 गुण नोंदविले असून ते चौथ्या क्रमांकावर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT