Marco Jansen Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: 'मॅन ऑफ द मोमेंट'! ईशान किशनचा मोठा शॉट फसला, मार्को यान्सननं बाऊंड्री लाईनवर घेतला भन्नाट कॅच; चाहतेही अवाक

Marco Jansen One Handed Catch Ishan Kishan: पंजाबचा वेगवान गोलंदाज मार्को यान्सनने सीमा रेषेवर घेतलेला एक अद्भूत झेल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

Manish Jadhav

Marco Jansen One Handed Catch Ishan Kishan: न्यू चंदीगड येथील मुल्लांपूर क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगलेल्या आयपीएल 2026 च्या चौथ्या सामन्यात फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा थरार पाहायला मिळाला. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र हैदराबादच्या फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवत निर्धारित 20 षटकांत 219 धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात जिथे फलंदाजांचे वर्चस्व होते, तिथे पंजाबचा वेगवान गोलंदाज मार्को यान्सनने सीमा रेषेवर घेतलेला एक अद्भूत झेल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

सनरायझर्स हैदराबादच्या डावाचा विचार केल्यास, त्यांना ट्रॅविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी वादळी सुरुवात करुन दिली. विशेषतः अभिषेक शर्माने आपल्या फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. त्याने अवघ्या 28 चेंडूत 74 धावांची तुफानी खेळी खेळली, ज्यात 5 चौकार आणि तब्बल 8 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. अभिषेकच्या या आक्रमक पवित्र्यामुळे हैदराबादने पहिल्या 6 षटकांतच 100 धावांचा टप्पा ओलांडला. 9 व्या षटकात 120 धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर ईशान किशन मैदानात उतरला. कर्णधार म्हणून किशनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती आणि त्याने तशी सुरुवातही केली होती.

14 व्या षटकात अर्शदीप सिंग गोलंदाजी करत असताना एक नाट्यमय वळण आले. अर्शदीपच्या शेवटच्या चेंडूवर ईशान किशनने (Ishan Kishan) 'काऊ कॉर्नर'च्या दिशेने एक जोरदार प्रहार केला. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नसल्याने चेंडू थेट षटकारासाठी जाईल असे वाटत होते. मात्र, त्याचवेळी मार्को यान्सन चेंडूच्या दिशेने चित्त्याच्या वेगाने धावत आला आणि त्याने हवेत झेप घेत एका हाताने चेंडू रोखून झेल पूर्ण केला. यान्सनचे हे क्षेत्ररक्षण पाहून खुद्द ईशान किशन आणि पंजाब किंग्सचे खेळाडूही अवाक झाले. किशन 17 चेंडूत 27 धावा करुन माघारी परतला, पण यान्सनच्या त्या एका हाताने घेतलेल्या झेलने सामन्यात रंगत भरली.

हैदराबादने 219 धावांचे आव्हान पंजाबसमोर ठेवले असले तरी, अभिषेक शर्माची फटकेबाजी आणि मार्को यान्सनची 'सुपरमॅन' फिल्डिंग या सामन्याची खरी आकर्षणे ठरली. मुल्लांपूरच्या मैदानात प्रेक्षकांना चौकार-षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली असून, आता पंजाबचे फलंदाज या मोठ्या आव्हानाचा कसा सामना करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अभिषेक शर्माने दाखवलेला फॉर्म हैदराबादसाठी आगामी सामन्यांत मोठी जमेची बाजू ठरु शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: शनीची उलटी चाल ठरणार निर्णायक! 'या' राशींवर पैशांचा वर्षाव, तर काहींना होऊ शकतो आर्थिक फटका

Income Tax Return: 31 जुलैची मुदत वाढणार का? आयटीआर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका

Dharmendra Pradhan Resigns: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवर जल्लोष! ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए…’,म्हणत अभिजीत दीपकेची टोलेबाजी VIDEO

Dharmendra Pradhan Resigns: सीजेपी आंदोलनापुढे अखेर मोदी सरकार झुकले! धर्मेंद्र प्रधान यांनी दिला केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा

Dona Paula Car Accident: वाहन पार्किंगचा हलगर्जीपणा चालकाला पडला महागात! उतारावरून गाडी थेट गॅरेजमध्ये, आलिशान वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT